Team india : omicron चा भारतीय क्रिकेट टीमला कोणताही धोका नाही, अफ्रिकेची हमी

भारताची टीम दक्षिण अफ्रिकेत  3 कसोटी सामने 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय टीमचा हा दौरा मोठा आहे. आता भारताचा 'अ' संघही दक्षिण अफ्रिकेतच आहे.

Team india : omicron चा भारतीय क्रिकेट टीमला कोणताही धोका नाही, अफ्रिकेची हमी
भारतीय कसोटी संघ

टीम इंडिया डिसेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोन आढळल्यानं टीम इंडियाच्या या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण खेळाडुंच्या सुरक्षेची काळजी घेण्याची हमी दक्षिण अफ्रिकेने दिली आहे.

डिसेंबरमध्ये साऊथ अफ्रिकेचा दौरा

डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहे. दक्षिण अफ्रिकेतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर खेळाडुंच्या आरोग्यविषयक सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र दक्षिण अफ्रिकेनं बायो बबल तयार करत खेळाडुंच्या सुरक्षेची हमी दिली आहे.

भारतीय टीम खेळणार 10 सामने

भारताची टीम दक्षिण अफ्रिकेत  3 कसोटी सामने 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय टीमचा हा दौरा मोठा आहे. आता भारताचा ‘अ’ संघही दक्षिण अफ्रिकेतच आहे. भारतीय संघ नवा व्हेरिएंट आढळल्यानंतरही मागे हटला नाही. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडून खेळाडुंच्या सुरक्षेची हमी देतानाच बीसीसीआयचं कौतुकही करण्यात आलं आहे.

अनेक देशात अफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी

नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. युरोपसह अनेक देशात नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगानं होत आहे. दिवसेंदिवस नवा व्हेरिएंट आढळलेल्या देशांची यादी वाढत चालली आहे. त्यानंतर अनेक देशांनी संभाव्य धोका ओळखून काही निर्बंधही लागू केले आहेत. राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे टीम इंडियांच्या या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती मात्र तुर्तास तरी हा दौरा होणार असल्याचं दिसून येत आहे. आगामी काही दिवसांत या दौऱ्यात काही बदल होतात का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महापालिका निवडणुका पॅनल पद्धतीने नकोच, उच्च न्यायालयात याचिका दाखल

Video: देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना ‘तो’ गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ

सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव खास, ‘विजेता’ फेम अभिनेता गौरीश शिपुरकरने व्यक्त केल्या भावना!

Published On - 5:03 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI