AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: जसप्रीत बुमराहला कॅप्टन बनवून चूक केली? वसीम जाफर म्हणतात, ‘त्याच्याऐवजी…’

IND vs ENG: रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोना झाल्यामुळे एजबॅस्टन कसोटीसाठी टीम इंडियाला आपला कॅप्टन बदलावा लागला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jasprit bumrah) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

IND vs ENG: जसप्रीत बुमराहला कॅप्टन बनवून चूक केली? वसीम जाफर म्हणतात, 'त्याच्याऐवजी...'
Wasim JafferImage Credit source: IPL
| Updated on: Jul 01, 2022 | 12:17 PM
Share

मुंबई: रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोना झाल्यामुळे एजबॅस्टन कसोटीसाठी टीम इंडियाला आपला कॅप्टन बदलावा लागला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jasprit bumrah) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. बुमराहच्या कॅप्टनशिपवर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मोठ विधान केलं आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी चेतेश्वर पुजाराला इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी कॅप्टन बनवायला पाहिजे होतं, असं वसीम जाफर (Wasim jaffer) यांचं मत आहे. पुजाराकडे बुमराह पेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे त्याची कॅप्टनशिप पदावर निवड योग्य ठरली असती, असं वसीम जाफर यांचं मत आहे. “पुजाराकडे अनभुव आहे. तो 90 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळला आहे. त्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय योग्य ठरला असता. बुमराहकडे कॅप्टनशिपचा कुठलाही अनुभव नाहीय. पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवलय. तो एक चांगला कॅप्टन आहे” असं वसीम जाफर ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना म्हणाले.

पुजाराला कॅप्टन न बनवण्यामागच कारणही सांगितलं

चेतेश्वर पुजाराला का कॅप्टन बनवलं नाही? ते कारणही वसीम जाफर यांनी सांगितलं. “चेतेश्वर पुजाराची कसोटी संघात जागा पक्की नाहीय. त्यामुळे कदाचित त्याची संघाच्या कर्णधारपदी निवड केली नसेल. त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. कदाचित हीच गोष्ट त्याच्या विरोधात गेली असावी. दक्षिण आफ्रिका सीरीजच्यावेळी सुद्धा मी म्हटलं होतं, केएल राहुलच्या जागी तुम्ही अजिंक्य रहाणेला कॅप्टन बनवा. कारण त्याने तुम्हाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका विजय मिळवून दिला आहे” असं जाफर म्हणाला.

जसप्रीत बुमराह सुद्धा धक्का देऊ शकतो

“जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याचं कॅप्टन बनणं निश्चित होतं. पण या सामन्याचं महत्त्व लक्षात घेता, मी पुजारालाच कॅप्टन म्हणून निवडलं असतं. जसप्रीत बुमराहला खेळाची चांगली समज आहे. कदाचित तो सुद्धा हार्दिक पंड्यासारख सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो” असंही जाफर शेवटी म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.