AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

David warner| टि्वटरवर जुन्या मालकाबरोबर डेविडचं भांडण, SRH ने दिलं कडक उत्तर

या कामगिरीनंतर सनरायजर्स हैदराबादने वॉर्नरला फक्त कर्णधारपदावरुनच हटवलं नाही, तर त्याने संघातलं स्थानही गमावलं.

David warner| टि्वटरवर जुन्या मालकाबरोबर डेविडचं भांडण, SRH ने दिलं कडक उत्तर
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 3:15 PM
Share

हैदराबाद: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नर आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये आता पूर्वीसारख सलोख्याचं नातं राहिलेलं नाहीय. डेविड वॉर्नरचा आपल्या जुन्या फ्रेंचायजीवर राग असल्याचं त्याच्या टि्वटमधून स्पष्ट झालं आहे. आयपीएल 2021 मध्ये वॉर्नर बॅटने फार कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे त्याला SRH च्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. 2021 च्या आयपीएल सीझनमध्ये वॉर्नरने 24.37 च्या सरासरीने आठ सामन्यांमध्ये फक्त 195 धावा केल्या. (On Twitter war of words between David Warner Vs SRHs Goes Viral)

या कामगिरीनंतर सनरायजर्स हैदराबादने वॉर्नरला फक्त कर्णधारपदावरुनच हटवलं नाही, तर त्याने संघातलं स्थानही गमावलं. आयपीएल 2021मध्ये डेविड वॉर्नरला संघातून वगळण्याचा क्रिकेटशी संबंध नाहीय, असे सनरायजर्स हैदराबादचे सहाय्यक कोच ब्रॅड हॅडिन यांनी सांगितलं आहे.

कॅप्टनशीपवरुन हटवल्यावर वॉर्नर म्हणाला….

कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर वॉर्नरनेही फ्रेंचायजीवर जोरदार टीका केली होती. कर्णधारपदावरुन हटवताना संघ व्यवस्थापनाने आपल्याला कल्पना दिली नाही. संवादाचा अभाव होता असा आरोप वॉर्नरने केला होता. टॉम मुडी पुन्हा SRH च्या कोचपदाची जबाबदारी संभाळणार आहेत, त्या बद्दल इन्स्टाग्रामवरील SRH च्या फॅन पेजवर चाहत्यांना त्यांचे मत विचारण्यात आले होते.

त्यावर एका चाहत्याने ‘टॉम मुडी हेड कोच, डेविड वॉर्नर कॅप्टन’ असे लिहिले होते. त्यावर वॉर्नरने ‘नो थँक्स’ असा रिप्लाय दिला होता. त्याचवेळी वॉर्नर हैदराबादकडून खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते.

डेविड वॉर्नर विरुद्ध एसआरएच वाद पुन्हा सुरु आता पुन्हा एकदा टि्वटरवर वॉर्नर विरुद्ध SRH सामना सुरु झाला आहे. एका चाहत्याने टॉम मुडीला टि्वट करत लिलावात चांगले खेळाडू निवडा असे सांगितले. त्यावर वॉर्नरने ‘शंका आहे’ अशी कमेंट केली. त्यानंतर SRH चे लगेच डेविड वॉर्नरच्या कमेंटवर उत्तर दिले. “अॅशस विजयाबद्दल डेविड तुझे अभिनंदन. तू फॉर्म मध्ये आला आहेस. सध्या पार्टीचा आनंद घेत आहेस. तुझ्यासाठी लिलाव चांगला ठरो” असे टि्वट केले आहे. वॉर्नर आणि एसआरएचमधील या टि्वटवरुन दोघांमधील संबंध बिघडल्याचे स्पष्ट होते. येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये आयपीएलचा मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Mohammad Siraj Celebration: सिराजचं आफ्रिकेत रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, प्रीमियर लीगची सॉलिड रिअ‍ॅक्शन Dr Maya Rathod| मातृत्व, संसार संभाळून मुंबईकर डॉ. माया राठोडांची ऑस्ट्रेलियात बॉडी बिल्डिंगमध्ये यशस्वी झेप IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.