PAK vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडला सोडायचं नाही; शोएब अख्तरचा पाकिस्तान संघाला संदेश

टी-20 विश्वचष्क स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत (New Zealand) होणार आहे, त्यामुळे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला संदेश दिला आहे की, न्यूझीलंडला 'सोडू नका'.

PAK vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडला सोडायचं नाही; शोएब अख्तरचा पाकिस्तान संघाला संदेश
Shoaib Akhtar

दुबई : भारतासोबत सामना होता तेव्हा पाकिस्तानी संघाचा नारा होता, ‘घाबरू नका’. आता पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत (New Zealand) आहे तर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला संदेश दिला आहे की, न्यूझीलंडला ‘सोडू नका’. (Our Real Anger Is With New Zealand, Not India: Shoaib Akhtar)

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) त्याच्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलताना पाकिस्तानी संघाला हा संदेश का दिला आहे. खरंतर अख्तरच्या या सल्ल्याचे तार न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्याशी जोडलेले आहेत. पाकिस्तान दौऱ्याबाबत किवी संघाने उचललेल्या पावलामुळे पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर शरमेने मान खाली घालावी लागली होती. शोएब अख्तर एकप्रकारे त्या अपमानाचा बदला घेण्यास सांगत आहे.

वास्तविक, न्यूझीलंडचा संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्याच्या इराद्याने पाकिस्तानला पोहोचला होता. रावळपिंडीत एकदिवसीय मालिका खेळवली जाणार होती. पण, ज्या दिवशी सामना सुरू होणार होता, त्याच दिवशी रावळपिंडीत उडालेल्या गोंधळाने किवी खेळाडूंना धक्का बसला. ते घाबरून परत गेले आणि त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाख प्रयत्नांनंतरही तो मान्य झाला नाही. न्यूझीलंडचा संघ मध्येच दौरा सोडून माघारी परतला, त्यानंतर पाकिस्तानला चांगलाच फटका बसला. इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावरही त्याचा परिणाम झाला. हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

न्यूझीलंडला सोडायचं नाही : शोएब अख्तर

त्या घटनेनंतर आज न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तानच्या खेळाडूंसमोर असेल. संपूर्ण पाकिस्तान बदलाच्या भावनेने हा सामना पाहत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या शब्दांवरूनही हेच दिसून येते. शोएब अख्तर म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतत होतं. ही अशी वेळ होती जेव्हा आपल्या देशाला न्यूझीलंडची गरज होती, पण त्यांनी आम्हाला दुखावले. त्यांच्या या कृतीने जगाला पाकिस्तानबाबत चुकीचा संदेश दिला गेला. आता क्रिकेटमधूनच त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांना सोडू नका.”

त्याने पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला पुन्हा आठवण करून दिली की घाबरू नका. जसे आपण भारताविरुद्ध खेळलो, रणनीती अंमलात आणली, त्याचप्रमाणे आज न्यूझीलंडलाही ठिक करावं लागणार आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो ‘अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे’

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(Our Real Anger Is With New Zealand, Not India: Shoaib Akhtar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI