AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam | बाबर आझम याचा कारनामा, विराट कोहली याला पछाडत महारेकॉर्ड

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात बाबर आझम याने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

Babar Azam | बाबर आझम याचा कारनामा, विराट कोहली याला पछाडत महारेकॉर्ड
| Updated on: May 05, 2023 | 9:33 PM
Share

इस्लामाबाद | क्रिकेट विश्वात एका बाजूला आयपीएल 16 वा सिजन सुरु आहे. या 16 व्या हंगामात क्रिकेट चाहत्यांना थरार पाहायला मिळतोय.. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेत पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम धमाकेदार कामगिरी करतोय. बाबर आझमने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात मोठा रेकॉर्ड केला आहे. बाबरने यासह दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आणि टीम इंडियाचा विराट कोहली या दोघांना मागे टाकलंय.

बाबर आझमचा धमाका

बाबर आझम याने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 117 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 107 धावांची शतकी खेळी केली. या दरम्यान बाबरने 19 रन्स पूर्ण करताच मोठा कारनामा केला. बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विशेष बाब म्हणजे बाबर आझम वनडे क्रिकेटमध्ये जलद 5 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. बाबरने अवघ्या 97 डावांमध्ये हा कारनामा केला आहे.हाशिम आमला याने 101 आणि विराट कोहली यने 114 डावांमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आता बाबरने या दोघांना मागे टाकलंय.

वनडेमध्ये वेगवान 5 हजार धावा करणारे फलंदाज

बाबर आजम – 97 डाव हाशिम अमला – 101 डाव विराट कोहली – 114 डाव विवियन रिचर्ड्स – 114 डाव डेव्हिड वॉर्नर – 115 डाव

न्यूझीलंडला 335 धावांचं आव्हान

दरम्यान पाकिस्तानने न्यूझीलंडला 335 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 334 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझम याचा अपवाद वगळता आघा सलमान याने सर्वाधिक 58 धावा केल्या. मसूद याने 44 रन्सचं योगदान दिलं. इफ्तिखार अहमद याने 28 रन्स केल्या. रिजवान 24 धावा करुन माघारी परतला. शाहिन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. तर मोहम्मद हरीस 17 रन्सवर नॉट आऊट राहिला. तसेच फखर झमान याने 14 रन्सचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बेन लिस्टर आणि इश सोढी या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, शान मसूद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, मोहम्मद हारिस, आगा सलमान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम जूनियर.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​टॉम ब्लंडेल (wk), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, कोल मॅककॉनची, इश सोधी, मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर आणि बेन लिस्टर.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.