AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK VS NZ, 4th Odi | उस्मा मीर याचा ‘चौका’, पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 102 धावांनी शानदार विजय

पाकिस्तानने चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 102 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानने यासह वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

PAK VS NZ, 4th Odi | उस्मा मीर याचा 'चौका', पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 102 धावांनी शानदार विजय
| Updated on: May 06, 2023 | 12:30 AM
Share

कराची | पाकिस्तान क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर चौथ्या एकदिवसीय सामन्यात 102 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 335 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने न्यूझीलंडला 43.4 ओव्हरमध्ये 232 धावावंर ऑलआऊट केलं. पाकिस्तानने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने एकतर्फी आघाडी घेतली. तसेच पाकिस्तानने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. बाबर आझम आणि उस्मा मीर हे दोघे पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरले. बाबर आझम याने पहिले बॅटिंग करताना 107 धावांची शतकी खेळी केली. तर उस्मा मीर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडकडून कॅप्टन टॉम लॅथम याने सर्वाधिक 60 धावा केल्या. मार्क चॅपमॅन 46 धावा करुन माघारी परतला. डॅरेल मिचले याने 34 धावांचं योगदान दिलं. टॉम ब्लंडेल 23 रन्सवर आऊट झाला. विल यंग याने 15 रन्स जोडल्या. तर जेम्स निशामने 11 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. या व्यतिरिक्त उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून उस्मा मीर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद वसिम ज्युनिअर याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हरीस रौफ याने 2 विकेट्स घेतल्या. तर शाहिन आफ्रिदी याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

पाकिस्तानची बॅटिंग

दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 334 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझम याचा अपवाद वगळता आघा सलमान याने सर्वाधिक 58 धावा केल्या. मसूद याने 44 रन्सचं योगदान दिलं. इफ्तिखार अहमद याने 28 रन्स केल्या. रिजवान 24 धावा करुन माघारी परतला. शाहिन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. तर मोहम्मद हरीस 17 रन्सवर नॉट आऊट राहिला. तसेच फखर झमान याने 14 रन्सचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बेन लिस्टर आणि इश सोढी या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

पाकिस्तान एक नंबर

दरम्यान पाकिस्तान या विजयासह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये एक नंबर टीम ठरली आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, शान मसूद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, मोहम्मद हारिस, आगा सलमान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम जूनियर.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​टॉम ब्लंडेल (wk), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, कोल मॅककॉनची, इश सोधी, मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर आणि बेन लिस्टर.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.