PAK vs NZ : विल यंगचा शतकी धमाका, पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी, रचीन रवींद्रचा रेकॉर्ड ब्रेक
Will Young Century : विल यंग याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली आहे. विलने यजमान पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त शतकी खेळी केली आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली आहे. विलने नवव्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलंय. विल यंग याने यासह या स्पर्धेतील नवव्या पर्वातील पहिला शतकवीर हा बहुमान मिळवला आहे. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या न्यूझीलंडची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. न्यूझीलंडने झटपट 2 विकेट्स गमावल्याने त्यांची बिकट स्थिती झाली होती. मात्र विलने एक बाजू लावून धरली आणि न्यूझीलंडचा डाव सावरला आणि संघाला चांगल्या स्थितीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
चौथं शतक आणि रचीन रवींद्रचा रेकॉर्ड ब्रेक
विलने 35 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर 1 धाव घेत शतक पूर्ण केलं. विलने यासह 107 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. विलने या शतकी खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तसेच विलच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. विलने यासह न्यूझीलंडचा युवा ऑलराउंडर रचीन रवींद्र याचा रेकॉर्ड ब्रेक केला. रचीनने वनडे क्रिकेटमध्ये 3 शतकं झळकावली आहेत.
विल चौथा फलंदाज
विल यंग चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक करणारा एकूण चौथा फलंदाज ठरला आहे. नॅथन एस्टल याने 2004 साली यूएसएविरुद्ध नाबाद 145 धावा केल्या होत्या. ख्रिस केर्न्स याने 2000 साली अंतिम सामन्यात नैरोबी येथे टीम इंडियाविरुद्ध नाबाद 102 धावा केल्या होत्या. तर केन विलियमसन याने 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 धावा केल्या होत्या.
विल यंगचं चौथं एकदिवसीय शतक
Starting the Champions Trophy in style! Will Young’s fourth ODI century comes from 107 balls with 11 fours and a six. Scores | https://t.co/0pC37HtJtv #ChampionsTrophy #CricketNation 📸 = ICC/Getty pic.twitter.com/VZBnwbGZAK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.