क्रिकेट बोर्डाची धुरा आता पंतप्रधानांच्या हाती! 2024 टी20 वर्ल्डकपपूर्वी उचललं मोठं पाऊल
क्रिकेटमध्ये बरेच बदल घडत असतात. नवे नियम आणि अतितटीच्या सामन्यांमुळे मनोरंजन होतं. पण असं सर्व होत असताना संघ निवडीवरून बरीच माथापच्ची करावी लागते. कधी कोणाला संघात स्थान मिळतं. तर कधी खराब परफॉर्मन्समुळे बाहेरचा रस्ता दाखवला जातो. असं असताना अनेकदा वशिलाबाजी केल्याचा आरोपही होतो. आता क्रिकेटच्या निर्णयात पंतप्रधान हस्तक्षेप करणार असल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर अनेक संघांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळालं. खासकरून पाकिस्तान क्रिकेट संघात बरेच बदल झाले. बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. तसेच कोचिंग स्टाफमध्येही बदल करण्यात आला. आता पुन्हा एका पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयात आता थेट पंतप्रधानांचा हस्तक्षेप असणार आहे. पीसीबीला आता सर्व रिपोर्ट पंतप्रधानांना सोपवावे लागतील. या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवे बदल पाहायला मिळू शकतात.पूर्वी पीसीबी आयपीसीच्या कक्षेत कार्यरत होते आणि ते प्रांतीय समन्वय मंत्रालयाद्वारे नियंत्रित होत होतं. पण आता ते थेट पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) सर्व सूत्र हलवली जातील. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये येत्या काही दिवसात मोठे उलटफेर पाहायला मिळतील. पाकिस्तान क्रिकेटचा ढासळलेला दर्जा सुधारण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. पण पाकिस्तानची सध्याची स्थिती पाहता हा निर्णय देखील फसेल असं चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. टी20 संघाची धुरा शाहीन अफ्रिदीच्या खांद्यावर आहे. पण त्याच्या नेतृत्वात पहिलीच मालिका गमवण्याची वेळ आली होती. न्यूझीलंडने पाकिस्ताने 4-1 पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्णधारपद आणि खेळाडूंच्या निवडीवरून बराच वादंग झाला होता. आता पंतप्रधान पाकिस्तानला विजयाच्या ट्रॅकवर आणतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोणत्या खेळाडूंवर विश्वास ठेवला जाईल आणि कोणाकडे धुरा सोपवणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
Pakistan Cricket Alert 🚨 🔸Caretaker government's big decision about Pakistan Cricket Board..PCB affairs have been removed from the control of the Ministry of Inter-Provincial Coordination. Pakistan Cricket Board affairs have been transferred to the cabinet division. The… pic.twitter.com/O21idNCPEr
— Abubakar Bin Tallat (@AbubakarAbbasii) February 19, 2024
पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात खेळलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप मिळाला. पाकिस्तानची हतबलता यावेळी दिसून आली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच विजयी टक्केवारी घटल्याने अंतिम फेरीतील स्थान देखील डळमळीत झालं आहे.
Landmark Move!
By transferring PCB from IPC to Cabinet Division today, Pakistan Cricket Board (PCB) has been put under the direct control of the Prime Minister, who is also Patron PCB. It would help smooth and easy decision making by ending a 3-tier bureaucratic red tapism,… pic.twitter.com/tZCFZWMPHE
— Shakil Shaikh (@shakilsh58) February 19, 2024
वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर बाबर आझमला तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमधून दूर करण्यात आलं. त्यानंतर कसोटी संघाची धुरा शान मसूदकडे, तर टी20 क्रिकेटचं कर्णधार शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आलं आहे. वनडे फॉर्मेटसाठी कर्णधाराची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही. पाकिस्तान वनडे वर्ल्डकपनंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. तर सध्या पाकिस्तान प्रीमियर लीग सुरु आहे.
