AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : नंबर 1 पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं कठीण! या मालिकेवर सर्वकाही ठरणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी नऊ संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दोन वर्ष साखळी फेरीचे सामने खेळल्यानंतर टॉप 2 संघांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. सध्या पाकिस्तानचा संघ टॉपला असून अव्वल स्थान कायम ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. का आणि कसं ते समजून घ्या.

WTC 2025 : नंबर 1 पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं कठीण! या मालिकेवर सर्वकाही ठरणार
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी नंबर वन स्थान कायम ठेवणं पाकिस्तानसमोर मोठं आव्हान, ही मालिका ठरवणार भवितव्य
| Updated on: Dec 01, 2023 | 3:16 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. 2023 ते 2025 या कालावधीत 9 संघांमध्ये कसोटी सामने खेळले जाणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी दोन गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. पहिल्यांदा न्यूझीलंडने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. तिसऱ्या पर्वातही भारत अंतिम फेरी गाठेल अशीच स्थिती असून सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत विजयी टक्केवारी 100 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आपलं स्थान कायम ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं होतं. तर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे विजयी टक्केवारीत घसरण झाली.

पाकिस्तानला आता आपलं अव्वल स्थान कामय ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मातीत पराभूत करण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर असेल. तीन सामन्यांची मालिका 3-0 गमावली तर पाकिस्तानला मोठा फटका बसेल. दुसरीकडे, मालिका बरोबरीत सुटली किंवा एखादा सामना ड्रॉ झाला तरी विजयी टक्केवारीवर परिणाम होईल. त्यामुळे पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. तसेच बांगलादेश न्यूझीलंड कसोटी मालिकेचाही परिणाम दिसून येईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर, दुसरा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर आणि तिसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. तर भारतीय संघही दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वा कसोटी संघाची घोषणा झाली आहे. भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर आणि दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.

कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.