AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : पहिल्या सामन्याआधीच टीमला मोठा झटका, स्टार गोलंदाज तडकाफडकी निवृत्त, नक्की कारण काय?

International Cricket Retirement : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेत पाकिस्तान आपला पहिला सामना 12 सप्टेंबरला खेळणार आहे. त्याआधीच एका वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

Asia Cup 2025 : पहिल्या सामन्याआधीच टीमला मोठा झटका, स्टार गोलंदाज तडकाफडकी निवृत्त, नक्की कारण काय?
Pakistan Bowler Usman ShinwariImage Credit source: Ashley Vlotman/Gallo Images/Getty Images
| Updated on: Sep 09, 2025 | 10:15 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्यापासून सुरुवात झाली आहे. आगामी वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तान क्रिकेट टीमचा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 12 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तान आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानच्या 31 वर्षीय वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

शिनवारी याने पाकिस्तानचं एकूण तिन्ही फॉर्मेटमधील 34 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. शिनवारी याने 34 सामन्यांमध्ये एकूण 48 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र शिनवारी याने सर्व फॉर्मेटमध्ये निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे. शिनवारी याच्याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज आसिफ अली यानेही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं.

उस्मान शिनवारी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

उस्मान शिनवारी याने 2013 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. उस्मानने श्रीलंकेविरुद्ध डेब्यू केला होता. उस्मानने पाकिस्तानचं टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मटेमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र उस्मानला फार संधी मिळाली नाही. उस्मानने पाकिस्तानचं 17 एकदिवसीय, 16 टी 20i आणि 1 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं. उस्मानला 12 वर्षांत एकूण 34 सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली.

पहिलाच सामना ठरला शेवटचा

उस्मानने 11 डिसेंबर 2019 रोजी श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. दुर्देवाने उस्मानचा पहिलाच सामना हा शेवटचा ठरला. उस्मानचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर उस्मानला निवड समितीने संधी दिली नाही.

पाकिस्तान क्रिकेट टीमचं आशिया कप 2025 स्पर्धेतील वेळापत्रक

विरुद्ध ओमान, 12 सप्टेंबर, दुबई

विरुद्ध टीम इंडिया, 14 सप्टेंबर, दुबई

विरुद्ध यूएई, 17 सप्टेंबर, दुबई

पाकिस्तानसह ए ग्रुपमध्ये आणखी कोण कोण?

दरम्यान पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये पाकिस्तानसह, भारत, ओमान आणि यूएईचा समावेश आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.