AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pat Cumminss: कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या मुस्लिम धर्माचा मान ठेवला, मैदानावरच्या कृतीने मन जिंकलं, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल कर्णधार पॅट कमिन्सच (Pat Cumminss) सर्वत्र कौतुक होत असतानाच मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत.

Pat Cumminss: कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या मुस्लिम धर्माचा मान ठेवला, मैदानावरच्या कृतीने मन जिंकलं, पाहा VIDEO
(AP Photo)
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 2:24 PM
Share

मेलबर्न: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 4-0 ने धुळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल कर्णधार पॅट कमिन्सच (Pat Cumminss) सर्वत्र कौतुक होत असतानाच मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. संघ विजयी जल्लोषात रमलेला असताना कमिन्सने सहकाऱ्यासाठी केलेली कृती खरोखरच कौतुकास्पद आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका 4-0 ने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ शॅम्पेन उडवण्याच्या तयारीत होता. पण कमिन्सने सर्वांना असं करण्यापासून रोखलं.

कमिन्सने का रोखलं? ऑस्ट्रेलियाच्या या विजयी संघात उस्माम ख्वाजा सुद्धा होता. तो मुस्लिम आहे. शॅम्पेन म्हणजेच दारुचा प्रकार असल्याने उस्मान ख्वाजा सेलिब्रेशन पासून लांब होता. मैदानावर ही गोष्ट जेव्हा कमिन्सच्या लक्षात आली, तेव्हा त्याने सहकाऱ्यांना शॅम्पेन उडवण्यापासून रोखले व उस्माम ख्वाजा फोटो काढण्यासाठी बोलावले. उस्माम ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन संघात खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे.

तो सेलिब्रेशनपासून लांब उभा होता

या कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जोरदार कमबॅक केलं. चौथ्या सामन्यात त्याने सलग दोन शतकं झळकावली. उस्मान ख्वाजा धार्मिक गोष्टींचे पालन करतो. दारु अंगावर शिंपडली जाऊ नये, यासाठी तो सेलिब्रेशनपासून लांब उभा होता. म्हणून कमिन्सने सहकाऱ्यांना शॅम्पेन फोडण्यापासून रोखलं आणि उस्मानला विजयी जल्लोषात सहभागी करुन घेतलं. उस्मान ख्वाजा अ‍ॅशेस मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला. “उस्मान मुस्लिम आहे. त्यामुळे शॅम्पेन अंगावर उडवलेली त्याला आवडणार नाही” असे कमिन्सने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट घेतल्या.

कमिन्सच्या कृतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाने सुद्धा कमिन्सचा कौतुक केलं.

चांगला लीडर आपल्या संपूर्ण टीमची काळजी घेतो व प्रत्येकाचा समान आदर करतो. पॅट कमिन्स तसा लीडर आहे असं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या: IND vs SA : एकदिवसीय मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या उभय संघांची आतापर्यंतची कामगिरी रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ

(Pat Cumminss gesture towards Usman Khawaja after Ashes victory wins hearts)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार