GT vs MI Toss : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, सूर्यकुमार यादव ‘आऊट’

Gujarat Titans vs Mumbai Indians Playing 11 : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 17 व्या हंगामतील आपला पहिला सामना खेळत आहेत.

GT vs MI Toss : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, सूर्यकुमार यादव 'आऊट'
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 8:17 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 5 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना होणार आहे. हा सामना अहमबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला.  त्यामुळे शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीत गुजरात टायटन्सला पहिले बॅटिंग करुन मुंबई इंडियन्ससमोर विजयी धावांचं आव्हान द्यावं लागणार आहे.

सूर्यकुमार यादव अनफिट

सूर्यकुमार यादव हा अजूनही अनफीट आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पलटणसाठी हा मोठा फटका आहे. तसेच सूर्या नसल्याने पलटणच्या चाहत्यांमध्ये निराशा आहे. तर या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी 3 परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.  मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी आणि ल्यूक वूड या 3 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर स्पेंसर जॉन्सन, डेव्हिड मिलर आणि अझमतुल्लाह झझाई हे विदेशी खेळाडू गुजरात टायटन्सच्या टीममध्ये आहेत.

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला

मुंबईकडून चौघांचं पदार्पण

दरम्यान मुंबई इंडियन्सच्या या 17 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यातून एकूण 4 खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. मुंबईकडून शम्स मुलानी, नमन धीर, लुक वूड आणि गेराल्ड कोएत्झी या चौकडीने पदार्पण केलं आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर या चौघांचे फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.