AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik : 16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले, तिसऱ्यांदा ठरला सामनावीर, दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीविषयी जाणून घ्या…

कार्तिक पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरला. हा सामना 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला गेला होता.

Dinesh Karthik : 16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले, तिसऱ्यांदा ठरला सामनावीर, दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीविषयी जाणून घ्या...
दिनेश कार्तिकImage Credit source: social
| Updated on: Jun 18, 2022 | 7:58 AM
Share

नवी दिल्ली : काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (SA) भारतानं पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलंय. भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावातच आटोपला. या मोठ्या फरकानं भारतानं विजय संपादन केलाय.  आता रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. 37 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) चौथ्या सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. कार्तिकला त्याच्या जोरदार खेळीसाठी सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलंय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं एका वेळी 13 षटकांत केवळ 81 धावा केल्या होत्या. चार विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषभ पंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कार्तिकने हार्दिक पांड्यासोबत टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. कालच्या सामन्यात सगळीकडे दिनेशचीच चर्चा होती.

आयसीसीचं ट्विट

16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले

दिनेश कार्तिक आपल्या 16 वर्षांच्या T20 कारकिर्दीत केवळ तीनदाच सामनावीर ठरला आहे. हे तीन सामने भारतासाठी महत्त्वाचे किंवा करा किंवा मरोचे सामने होते. या तीन सामन्यांमध्ये कार्तिकने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला.

दिनेशची कारकिर्द जाणून घ्या…

कार्तिक पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरला. हा सामना 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला गेला होता. कार्तिकने 2018 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. हा सामना निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना होता. निदाहस करंडक स्पर्धेत तीन संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीतून बाद झाला. भारतासमोर बांगलादेशचे आव्हान होते. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला. बांगलादेशने 20 षटकांत 8 विकेट गमावून 166 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 18 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. शेवटच्या दोन षटकात टीम इंडियाला विजयासाठी 34 धावांची गरज होती. तेव्हा दिनेश कार्तिकसह विजय शंकर क्रीजवर उपस्थित होता. 19व्या षटकात रुबेल हुसैनच्या तीन चेंडूंवर कार्तिकने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला. 19व्या षटकात कार्तिकने 22 धावा देत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले.

काल दिनेशची खेळी जोरदार

शुक्रवारच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 169 धावा केल्या. कार्तिकनं 27 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. कार्तिकच्या झटपट खेळीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत 73 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्येवर रोखले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.