AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रीति झिंटाच्या एका चुकीमुळे पंजाब किंग्सचं स्पर्धेत झालं भलं, कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या काही पर्वात पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मात्र यंदाच्या पर्वात पंजाब किंग्सने 17 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. पण प्रीति झिंटाची एक चूक पंजाब किंग्सच्या पथ्यावर पडली आहे. जाणून घेऊयात नेमकी काय चूक केली होते ते..

प्रीति झिंटाच्या एका चुकीमुळे पंजाब किंग्सचं स्पर्धेत झालं भलं, कसं काय ते जाणून घ्या
प्रीति झिंटा आणि श्रेयस अय्यरImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2025 | 4:09 PM
Share

पंजाब किंग्सला एक चुकीचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसत आहे. खरं तर एखादी चूक करणं खूपच महागात पडते. पण पंजाब किंग्सच्या पथ्यावर ही चूक पडली आहे. प्रीति झिंटाने केलेल्या चुकीमुळे सर्वात आधी पश्चाताप झाला होता. मात्र हीच आता संघाच्या फायद्याची ठरताना दिसत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मिनी लिलाव पार पडला होता. 19 डिसेंबर 2023 रोजी बोली लागली होती. तेव्हा लिलावात 19 वर्षीय खेळाडूऐवजी चुकून 32 वर्षांच्या शशांक सिंहला विकत घेतलं. नाव साधर्म्य असल्याने हा घोळ झाला. पंजाब किंग्सने शशांकला संघात घेतल्यानंतर ही बाब कबूल केली होती. पण तेव्हा केलेली चूक पंजाब किंग्ससाठी आता फायदेशीर ठरत आहे. पंजाब किंग्सने 2025 मेगा लिलावापूर्वी शशांक सिंहला रिटेन केलं. कारण आयपीएल 2024 स्पर्धेत त्याने 44.25 च्या सरासरीने आणि 164.65 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यामुळे पंजाब किंग्स फ्रेंचायझीला यंदाच्या पर्वात त्याच्याकडून अपेक्षा होत्या. या अपेक्षा आता खऱ्या होताना दिसत आहेतय

शशांक सिंह एक फिनिशर म्हणून जबरदस्त भूमिका बजावत आहे. पंजाब किंग्सला सामना जिंकून देण्यात आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 68.25 च्या सरासरीने आणि 151.66 च्या स्ट्राईक रेटने 273 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर 18 मे रोजी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात संघाचं नेतृत्वही केलं. श्रेयस अय्यरच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला नाही. तेव्हा शशांक सिंहने कर्णधारपद भूषवून विजय मिळवून दिला. इतकंच काय तर मॅनेजमेंटचा विश्वासही जिंकला. त्यामुळे प्रीति झिंटाने ऑक्शन टेबलवर केलेली चूक संघासाठी फायद्याची ठरली आहे.

पंजाब किंग्सने 12 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवला आणि एक गुण वाटेला आहे. त्यामुळे 17 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असल्याने तिसऱ्या स्थानावर आहे. आता टॉप दोनमध्ये जागा निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल