AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy 2022: 3 बॉलमध्ये संपला पृथ्वी शॉ चा खेळ, सेमीफायनलमध्ये मुंबई-उत्तर प्रदेश आमने-सामने

रणजी करंडक (Ranji Trpohy) क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ दमदार खेळतोय. पण त्यांचा कॅप्टन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आऊट ऑफ फॉर्म आहे.

Ranji Trophy 2022: 3 बॉलमध्ये संपला पृथ्वी शॉ चा खेळ, सेमीफायनलमध्ये मुंबई-उत्तर प्रदेश आमने-सामने
Prithvi shawImage Credit source: instagram
| Updated on: Jun 14, 2022 | 12:40 PM
Share

मुंबई: रणजी करंडक (Ranji Trpohy) क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ दमदार खेळतोय. पण त्यांचा कॅप्टन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आऊट ऑफ फॉर्म आहे. पृथ्वीचा खराब खेळ सुरुच आहे. उत्तर प्रदेश विरुद्धच्या सेमीफायनल (MUM vs UP Semi final) मॅचमध्ये पृथ्वी शॉ ची बॅट चालली नाही. पृथ्वी खात सुद्धा उघडू शकला नाही. उत्तर प्रदेश विरुद्ध पृथ्वी शॉ चा डाव अवघ्या 3 चेंडूत आटोपला. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या यश दयालने पृथ्वीचा खेळ संपवला. यश दयालने पृथ्वीला प्रियम गर्गकरवी झेलबाद केलं. पृथ्वी नंतर फलंदाजीला आलेल्या अरमान जाफरला शिवम मावीने अवघ्या 10 रन्सवर आऊट केलं. मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये बंगळुरुमध्ये सामना सुरु आहे. उत्तर प्रदेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या मुंबईच्या दोन बाद 58 धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल (29) आणि मागच्या सामन्यातील द्विशतकवीर सुवेद पारकर (17) धावांवर खेळतोय.

पृथ्वीच्या बॅटला काय झालय?

पृथ्वी शॉ चा रणजी करंडक स्पर्धेत फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. शॉ ने या सीजनमध्ये 28.57 च्या सरासरीने फक्त 200 धावा केल्या आहेत. त्याने फक्त दोन अर्धशतकं झळकावली आहेत. पृथ्वी शॉ ने आयपीएलमध्ये 28.30 च्या सरासरीने 283 धावा केल्या होत्या. आयपीएल सुरु असतानाच पृथ्वी शॉ आजारी पडला होता. ते तीन ते चार दिवस रुग्णालयात होता. दिल्ली कॅपिटल्सला याच नुकसानही सहन कराव लागलं. दिल्लीचा संघ यावेळी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. मुंबई इंडियन्सकडून दिल्लीचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न मोडलं होतं.

क्वार्टर फायनलमध्ये मुंबईकडून वर्ल्ड रेकॉर्ड

रणजीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडला तब्बल 725 धावांनी हरवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. दुसरीकडे उत्तर प्रदेशनेही पहिल्यांदा कर्नाटकला नमवून रणजी करंडकाच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.