Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण

पीएसएलमधील ही त्याची चौथी फ्रेंचायजी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, 41 वर्षीय शाहीद आफ्रिदी घरातच क्वारंटाईन होणार आहे.

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या मोठ्य़ा क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पाकिस्तानसह अन्य देशातही शाहिदचा चाहतावर्ग आहे.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 5:14 PM

लाहोर: पाकिस्तान सुपर लीगमधील (Pakistan Super League) सलामीच्या सामन्याच्या काहीतास आधीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आजपासून कराचीमध्ये या लीगला सुरुवात होत आहे. आफ्रिदी क्वेट्टा ग्लॅडिएटर्सचे (Quetta Gladiators) प्रतिनिधीत्व करणार आहे. पीएसएलमधील ही त्याची चौथी फ्रेंचायजी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, 41 वर्षीय शाहीद आफ्रिदी घरातच क्वारंटाईन होणार आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर तसेच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघासोबत राहता येईल.

465 धावा केल्या मुल्तान सुल्ताने संघाने आफ्रिदिला क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाला दिले आहे. अष्टपैलू आफ्रिदीने PSL मध्ये 50 सामने खेळले आहेत. त्याने तीन फ्रेंचायजींकडून खेळताना 465 धावा केल्या आहेत. मुल्तान सुल्तान, पेशावर झालमी आणि कराची किंग्ज संघाकडून आफ्रिदी खेळला आहे. चेंडूने सुद्धा त्याने चांगलं योगदान दिलं आहे. प्रतिषटक सात पेक्षा कमी धावा देत त्याने 44 विकेट घेतल्या आहेत. PSL 2022 ला सुरुवात होण्याआधीच आफ्रिदीने ही त्याची शेवटची स्पर्धा असेल असे जाहीर केले होते.

“क्वेट्टा ग्लॅडिएटर्सकडून खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. 2019 ला जेतेपद पटकावल्यानंतरही PSL मध्ये आफ्रिदीने अनेक चढ-उतार अनुभवले. ही माझी शेवटची PSL स्पर्धा असून मला विजेतेपदाच्या ट्रॉफीसह स्पर्धेचा शेवट करायचा आहे” असे आफ्रिदीने सांगितले. 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान PSL 2022 स्पर्धा होणार आहे. कराची आणि लाहोर या दोन शहरात ही स्पर्धा होणार आहे. कराची किंग्ज आणि मुल्तान सुल्तानमध्ये गुरुवारी सलामीचा सामना होणार आहे.

PSL 7 Former Pakistan all-rounder Shahid Afridi tests Covid-19 positive

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.