AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना थांबवला, मैदानात ब्लॅकआऊट

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना धर्मशाळेत सुरु आहे. हा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. मात्र पाकिस्तानने हल्ले सुरु केल्याने हा सामना थांबवण्यात आला आहे.

मोठी बातमी! पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना थांबवला, मैदानात ब्लॅकआऊट
धर्मशाळाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 08, 2025 | 10:11 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना  थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत आहेत. यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हा सामना थांबवण्यात आला आहे. हा सामना सीमेपासून 150 किमी दूर असलेल्या धर्मशाळेत सुरु होता. पण या मैदानावर हल्ला होऊ शकतो. या अनुषंगाने हा सामना थांबवण्यात आला अशी माहिती मिळत आहे.  लाईट्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे, अशी माहिती सुरुवातीला सांगत होते. पण मीडिया रिपोर्टनुसार, सीमेवरील स्थिती पाहता हा निर्णय घेतला. आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. 10.1 षटकांचा खेळ झाला होता. पंजाब किंग्सने 1 गडी गमवून 122 धावा केल्या होत्या. तितक्यात मैदानात ब्लॅकआऊट झाला आणि सामना थांबवण्यात आला.  आता हा सामना रद्द करण्यात आल्याची आता माहिती समोर आली आहे.  सद्यस्थिती पाहता सीमेलगत असलेल्या शहरात एकापाठोपाठ एक ब्लॅकआऊट केला जात आहे. तसेच पाकिस्तानकडून होणारे हल्ले भारताकडून परतवून लावले जात आहे. एअर डिफेंस सिस्टमच्या माध्यमातून सर्व हल्ले निष्फळ केले आहेत.

दरम्यान, मैदानावरील फ्लडलाइट्स पहिल्यांदा 9 वाजून 29 मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जाताना दिसले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल अधिकाऱ्यांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. यानंतर सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी घेतली. हा सामना पावसामुळे एक तास उशिराने सुरु झाला होता. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 122 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्यची विकेट पडली आणि श्रेयस अय्यर मैदानात आला. पण तेव्हाच सामना थांबवण्यात आला. प्रियांश आर्यने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारत 70 धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने 28 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.