AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL New Team Auction 2021: संघ 2, खरेदीसाठी 10 कंपन्यांमध्ये चढाओढ, मँचेस्टर युनायटेड आघाडीवर

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन नवीन संघांसाठी 10 बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिदों यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत.

IPL New Team Auction 2021: संघ 2, खरेदीसाठी 10 कंपन्यांमध्ये चढाओढ, मँचेस्टर युनायटेड आघाडीवर
आयपीएल लिलाव
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 3:22 PM
Share

दुबई : येथील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपताच, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ही बातमी मोठी यासाठी आहे कारण, बीसीसीआय लवकरच आयपीएलमधील दोन नव्या संघांची घोषणा करणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण फक्त 8 संघांची चढाओढ पाहिली आहे. पण 2022 चा हंगाम थोडा वेगळा असेल, जिथे 8 नव्हे तर 10 संघ खेळताना दिसतील. दोन नवीन संघांसाठी, बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे, ज्यासाठी बोली सुरू आहे. (Race among 10 companies to buy new IPL teams, Manchester United owners leading Auction)

अहवालानुसार, दोन नवीन संघांसाठी 10 बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिदों यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत. अहवालांनुसार, अहमदाबाद, इंदूर आणि लखनौ येथून संघ खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.

2 संघांसाठी 10 कंपन्यांनी बोली लावली आहे. या निविदांसाठी तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जो कोणी बीसीसीआयचे सर्व मापदंड पूर्ण करेल, तो संघाचा मालक बनण्याचा हक्कदार असेल. तांत्रिक बोलीची छाननी केल्यानंतर आर्थिक बोली खुली होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 ते 3.30 या वेळेत 2 नवीन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

टीओआयच्या अहवालानुसार, मँचेस्टर युनायटेडचे ​​मालक सध्या पुढील मोसमासाठी नवीन आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, एमएस धोनीचे कामकाज पाहणारी कंपनी रिती स्पोर्ट्सनेही आयपीएल संघ विकत घेण्यासाठी बोली लावल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त अमृत लीला एंटरप्रायझेस या कंपनीनेदेखील आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. आयपीएल संघांच्या लिलावात या दोन कंपन्यांची बोली सर्वांना आश्चर्यचकीत करणारी ठरली आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(Race among 10 companies to buy new IPL teams, Manchester United owners leading Auction)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.