ENG vs IND : टीम इंडियाला तगडा झटका, इंग्लंड दौऱ्यातून स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, कुणाला संधी?
India Tour of England 2025 : इंग्लंड दौऱ्यात वूमन्स टीम इंडिया टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. युवा खेळाडूला दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

मेन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या मिशन इंग्लंडला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स यजमान संघाचं कर्णधापद सांभाळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच सीरिज असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड दौऱ्याआधी वूमन्स टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
वूमन्स टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावं लागलं आहे. शुची उपाध्याय हीला दुखापतीमुळे टी 20I आणि वनडे सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे. बीसीसीआय वूमन या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच शुचीच्या जागी बदली खेळाडू म्हणून कुणाला संधी देण्यात आलीय? याबाबतची माहितीही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शुचीच्या जागी स्पिनर राधा यादव हीचा समावेश करण्यात आला आहे.
शुची उपाध्याय हीने गेल्या महिन्यात ट्राय सीरिजमधून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे डेब्यू केलं होतं. शुचीला इंग्लंड दौऱ्यासाठीही संधी देण्यात आली. मात्र शुचीला दुर्देवाने दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावं लागलंय.
राधा यादवची एन्ट्री
राधा यादव हीने आतापर्यंत टीम इंडियासाठी अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. राधाने आतापर्यंत 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40.37 च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच राधाने 84 टी 20 सामन्यांमध्ये 97 विकेट्स मिळवल्या आहेत.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
शनिवार 28 जून, पहिला सामना, ट्रेंट ब्रिज, नॉटिंगघम
मंगळवार, 1 जुलै, दुसरा सामना, काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल
शुक्रवार 4 जुलै, तिसरा सामना, केनिंग्टन ओव्हल
बुधवार 9 जुलै, चौथा सामना, मँचेस्टर
शनिवार 12 जुलै, पाचवा आणि अंतिम सामना, बर्मिंगघम
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 16 जुलै, साऊथम्पटन.
दुसरा सामना, शनिवार 19 जुलै, लंडन.
तिसरा सामना, मंगळवार 22 जुलै, चेस्टर ली स्ट्रीट.
वूमन्स इंडियाचा इंग्लंड दौरा
दरम्यान वूमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात यजमानांविरुद्ध 28 जून ते 22 जुलै दरम्यान टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघात 28 जून ते 12 जुलै दरम्यान टी 20I सीरिजचा थरार रंगणार आहे. तर 16 ते 22 जुलै दरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.
