AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थान रॉयल्सविरोधात FIR? वैभव सूर्यवंशींने केले काय? CM शिवकुमार यांच्या घोषणेने Team ला टपाटपा घाम

Rajasthan Royals FIR Vaibhav Suryavanshi: IPL 2026 मध्ये एक खळबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरोधात एफआयआर दाखल होणार आहे का? सीएम शिवकुमार यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे हे प्रकरण?

राजस्थान रॉयल्सविरोधात FIR? वैभव सूर्यवंशींने केले काय? CM शिवकुमार यांच्या घोषणेने Team ला टपाटपा घाम
राजस्थान रॉयल्सवर गुन्हा?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 07, 2026 | 3:39 PM
Share

Rajasthan Royals FIR Vaibhav Suryavanshi: IPL 2026 मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्स या संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सर्वात धमाकेदार, तडफदार फलंदाज वैभव सूर्यवंशीमुळे हा संघ अडचणीत आला आहे. या संघावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते सीएम शिवकुमार नायक यांनी ही धमकी दिली आहे. शिवकुमार नायर यांच्या मते सूर्यवंशी याला खेळवणे हा बाल मजुरीचा प्रकार आहे. त्याआधारे RR वर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण वैभव सध्या अवघ्या 15 वर्षांचा आहे. वैभव याला या वयात एक टार्गेट, एक मिशन अंतर्गत मैदानावर उतरवण्यात येते. त्याच्यावर संघासाठी धावा काढण्याचा दबावा असतो. हा सर्व प्रकार बाल शोषण पद्धती अंतर्गत येतो. शिक्षण घेण्याच्या वयात त्याच्याकडून धावा काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्सने वैभवचे केले शोषण

एका कन्नड वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान सीएम शिवकुमार नायक याने मोठा मुद्दा मांडला. राजस्थान रॉयल्स संघ या 15 वर्षाच्या खेळाडूचे शोषण करत असल्याचा मुद्दा समोर आणला. त्यासाठीच वैभव सूर्यवंशीला टीमने आयपीएलच्या सामन्यात उतरवल्याचा आरोप त्याने केला. हा बाल मजूरीचा प्रकार असल्याचा आरोप नायक यांनी केला. एक किशोरवयीन मुलाला इतक्या बड्या लिगमध्ये कसे खेळवण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्याने या वयात त्याच्या शिक्षणावर भर देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्याने शाळेत जावे. अभ्यास करावा. त्याचे आयुष्य जगावे. ते सोडून त्याला मैदानात एका मजूरासारखे धावा काढण्यासाठी जुंपल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याने इतक्या कमी वयात अशा स्पर्धात खेळणे हे मोठे आव्हानात्मक आणि मनावर परिणाम करणारे असल्याचा दावा त्यांनी या डीबेट शोमध्ये केला.

लवकरच राजस्थान रॉयल्सविरोधात गुन्हा

शिवकुमार नायक यांनी या सर्व प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तो क्रिकेट खेळत असताना कुणालाच कसं भान राहिलं नाही. इतक्या कमी वयातील मुलाला मोठी जबाबदारी देण्यात येत आहे. हा बाल शोषणाचा बाल मजूरीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. राजस्थान रॉयल्स संघाविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे आणि गुन्हा नोंदवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आयपीएलमध्ये क्रिकेट खेळण्याऐवजी वैभवने अभ्यास करणे आणि त्यांचे जीवन खेळण्या बागडण्यात घालवणे आवश्यक असल्याचे नायक म्हणाले.

आयपीएल खेळण्यासाठी वैभवला 1.1 कोटी

राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाने वैभव सूर्यवंशी याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 1.1 कोटींचा करार केला आहे. या हंगामात त्याची इतकी बोली लागली असली तरी पुढील हंगामात मात्र त्याला यापेक्षा अधिक बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षीपासून वैभव आयपीएलमध्ये खेळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा असाच मुद्दा उचलण्यात आला होता.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...