AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : सलग 2 सिक्ससह रजत पाटीदारची फिफ्टी, मग कोएत्झीने बदला घेतला

Gerald Coetzee Taked Revenge Rajat Patidar : सलग 2 सिक्स ठोकून अर्धशतक झळकावणाऱ्या रजत पाटीदार याचा कोएत्झी याने तिसऱ्या बॉलवर हिशोब क्लिअर केलाय.

MI vs RCB : सलग 2 सिक्ससह रजत पाटीदारची फिफ्टी, मग कोएत्झीने बदला घेतला
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 11, 2024 | 9:16 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार बॅट्समन रजत पाटीदार याने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. रजतने गेराल्ड कोएत्झी याच्या बॉलिंगवर सलग 2 खणखणीत षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर तिसऱ्यात बॉलवर गेराल्ड कोएत्झीने हिशोब क्लिअर केला. कोएत्झीने रजतला कॅच आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि सेट जोडी फोडली.

रजत पाटीदार याने 11 व्या ओव्हरपर्यंत नाबाद 38 धावा केल्या होत्या. गेराल्ड कोएत्झी आरसीबीच्या डावातील 12 वी ओव्हर टाकायला आला. रजतने कोएत्झीच्या या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर सलग 2 सिक्स खेचून अर्धशतक ठोकलं. रजतच्या आयपीएल कारकीर्दीतील तिसरं अर्धशतक ठरलं. रजतने 25 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने फिफ्टी पूर्ण केली. त्यानंतर कोएत्झीने तिसऱ्याच बॉलवर रजतला विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं आणि सलग ठोकलेल्या 2 सिक्सचा वचपा घेतला.

दरम्यान कोएत्झीने रजतला आऊट करत सेट जोडीही फोडली. रजत पाटीदार आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 3 आणि विल जॅक्स 8 धावांवर आऊट झाल्याने आरसीबीची 2 बाद 23 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर रजत आणि फाफ या दोघांनी ही निर्णायक भागीदारी करत आरसीबीचा डाव सावरला. पण कोएत्झी याने रजतला आरसीबीचा 105 स्कोअर असताना आऊट केलं.

रजतचं 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

Follow Us
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.