रजत पाटीदार खरा लीडर… बंगळुरूच्या विजयावर महानार्यमन यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 चा विजय मिळवला आहे. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत केले. महानार्यमन सिंधिया यांनी पाटीदार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

आयपीएलच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेत्रदीपक विजय मिळवला आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स दरम्यान अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची लढत झाली. पण आरसीबीने सर्व कसब पणाला लावून विजय मिळवला. त्यामुळे आरसीबीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खासकरून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्या नेतृत्व कौशल्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे. जीडीसीएचे उपाध्यक्ष आणि मध्यप्रदेश क्रिकेट लीगचे चेअरमन महानार्यमन सिंधिया यांनीही रजत पाटीदारचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रजत पाटीदार हा ट्रू लीडर असल्याचं महानार्यमन यांनी म्हटलं आहे.
जीडीसीएचे उपाध्यक्ष आणि मध्यप्रदेश क्रिकेट लीगचे चेअरमन महानार्यमन सिंधिया यांनी आयपीएल 2025मध्ये विजयी झालेल्या बंगळुरू टीमलाही शुभेच्छा दिल्या आहेत. महानार्यमन सिंधिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 18 वर्ष लागली. बंगळुरूला आयपीएलचा कप जिंकण्यासाठी मध्यप्रदेशातील एका योद्ध्याची गरज पडली. रजत पाटीदार तुम्ही ट्रू लीडर आहात. टीम बंगळुरूला शुभेच्छा, असं ट्विट महानार्यमन यांनी केलं आहे.
एमपीएल 12 जून रोजी
महानार्यमन सिंधिया यांनी बंगळुरूच्या विजयावर थेटपणे मध्यप्रदेश क्रिकेटची शान असलेल्या रजत पाटीदार याला शुभेच्छा दिल्या आहेत. रजत पाटीदार या वर्षी ग्वाल्हेर चिता टीममधून खेळणार आहेत. एमपीएल लगीमध्ये या वर्षी 7 पुरुष आणि 3 महिला टीम खेलणार आहेत. एमपीएलची सुरुवात 12 जून रोजी होणार आहे. एमपीएलचे सर्व सामने ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियममध्ये होणार आहेत.

Mahanaryaman Scindia
कोहलीचं स्वप्न पूर्ण
दरम्यान, तब्बल 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025ची ट्रॉफी पटकावली आहे. यामुळे विराट कोहलीचं स्वप्न पूर्ण झालं आहे. फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत केलं आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगला होता. या ऐतिहासिक सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजीला उतरताना 20 षटकांमध्ये 9 बळी देऊन 190 धावा पटकावल्या होत्या. तर या धावांचा पाठलाग करणं पंजाबला शक्य झालं नाही. पंजाब किंग्स केवळ 184 धावा बनवू शकला.
बंगळुरूच्या रस्त्यावर जल्लोष
आरसीबीच्या ऐतिहासिक वजियानंतर बंगळुरूच्या रस्त्यावर आज जल्लोष पाहायला मिळाणार आहे. आरसीबीच्या संघाची आज बंगळुरूच्या रस्त्यावर विजयी मिरवणूक निघणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही विजयी परेड होणार आहे. या परेडमध्ये सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत. कर्नाटक विधान भवनापासून ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत ही परेड निघणार आहे. आरसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. ही परेड ओपन बसमधून निघेल की नाही याबाबतची अद्याप स्पष्टता झालेली नाही.
