AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : लहान मुलासारखा धावत आला अन् .. विराटचा हा अंदाज कधीच पाहिला नसेल ! Video व्हायरल

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर विराट कोहलीचा अनोखा अंदाज पहायला मिळाला. आधी त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण नंतर तो विजयाचा जल्लोष करताना दिसला. शेवटी त्याने कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रींना लहान मुलासारखी मिठी मारली.

Virat Kohli : लहान मुलासारखा धावत आला अन् .. विराटचा हा अंदाज कधीच पाहिला नसेल ! Video व्हायरल
विराट-रवी शास्त्रींची जादू की झप्पीImage Credit source: social media
| Updated on: Jun 04, 2025 | 11:26 AM
Share

आयपीएल 2025 चा सीझन अखेर संपला असून मंगळवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने ट्रॉफीवर नाव कोरलं. पंजाब किंग्सला 6 धावांनी हरवत आरसीबीने फायनल मॅच जिंकली आणि आयपीएलचं पहिलं विजतेपद मिळवलं. गेल्या 18 वर्षांपासून सतत आरीसीबी सोबत असलेल्या, अनेक पराभव, निराशा पचवलेल्या विराट कोहलीसाठी कालचा विजय खूपच खास होता. विराटने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 17 हंगामात आरसीबीचा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला पण प्रत्येक वेळी यशाने त्यांना हुलकावणी दिली आणि आयपीएलचा चषक दुसऱ्याच संघाने जिंकला.

मात्र कालचा दिवस आरसीबीचा होता. सामना जिंकताच विराट चक्क मैदानात बसूनच रडू लागला. इतर खेळाडूंनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला, विराटही थोड्या वेळाने त्यांच्यात सामील झाला. सामन्यानंतरच्या सेलिब्रेशननमध्ये विराटचा अनोखा अंदाज दिसला. पत्नी अनुष्काला मिठी मारून रडणाऱ्या विराटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तर व्हायरल झालेच पण रवी शास्त्री यांच्यासोबतचा त्याचा एक व्हिडीओही खूप खास असून तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल.

विराट कोहली आणि रवि शास्त्री

रवी शास्त्री हे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. विराटच्या कर्णधारपदाच्या काळात रवी शास्त्री बराच काळ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले रवी शास्त्री हे काल आयपीएलच्या फायनल मॅचदरम्यान कॉमेंट्री करत होते. मॅचचा निकाल लागला, आरसीबी जिंकली, त्यानंतर मैदानात विराटने रवी शास्त्री यांना पाहिलं आणि तो जणू अगदी लहान मुलगाच झाला. दूर उभ्या असलेल्या रवी शास्त्रींना पाहून विराट एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत तिथे गेला आणि उडी मारत रवी शास्त्रींना चक्क जादूची झप्पीच दिली.

त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यातून विराट आणि रवी शास्त्री यांचं प्रेमाचं अनोखं नातं दिसतं. विराटची कृती पाहून रवी शास्त्रीही हसत होते, त्यांनी त्याला घट्ट मिठीत घेतलं, थोपटलं, डोक्यावरही मायेने हात फिरवत त्याचं अभिनंदन केलं. तिथेच विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माही उभी होती. विराट-रवी शास्त्री यांची भेट पाहून तिच्या चेहऱ्यावरही हसू फुललं, टाळ्या वाजवत तिने दोघांचही कौतुक केलं.

 

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.