AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin : सचिन याची शानदार शतकी खेळी, चाहते खूश

सचिनने आपल्या नेहमीच्या स्टाईलने टीम अडचणीत असताना निर्णायक क्षणी मैदानात उभा राहिला. तसेच त्याने शानदार शतक ठोकत टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.

Sachin : सचिन याची शानदार शतकी खेळी, चाहते खूश
| Updated on: Jan 17, 2023 | 11:59 PM
Share

रणजी क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. मुंबईच्या सरफराज खानने दिल्ली विरुद्ध पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं. दरम्यान केरळच्या सचिन बेबीनेही नाबाद 116 धावांची खेळी केली. मंगळवारी कर्नाटक विरुद्ध केरळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या दिवशी केरळने 6 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. टॉस जिंकून केरळचे फलंदाज झटपट आऊट झाले. राहुल पी आणि रोहन प्रेम दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर एस कुन्नुमला 5 धावा करुन माघारी परतला.

सचिनने शतकी खेळीसह जिंकली मनं

यानंतर सचिनने वत्सल गोविंद सोबत 120 धावा करत डाव सावरला. वी कौशिक वत्सलला आऊट करत भागीदारी तोडली. सलमान नजीर शून्यावर आऊट झाला. अक्षय चंद्रनने कॅप्टन सोबत 47 धावा जोडल्यानंतर 17 धावा करुन माघारी परतला. श्रेयस गोपळने त्याला माघारी पाठवलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जलज सक्सेना 31 धावांवर कॅप्टनसह नॉट आऊट आहे.

कर्नाटककडून वसूकी कौशिकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर विजयकुमार विशक आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

केरळ प्लेइंग इलेव्हन : सिजोमन जोसेफ (कर्णधार), पोन्नन राहुल (विकेटकीपर), जलज सक्सेना, रोहन प्रेम, सचिन बेबी, वत्सल गोविंद, सलमान निझार, अक्षय चंद्रन, , वैशाख चंद्रन, MD निधीश आणि रोहन कुन्नम्मल

कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), रविकुमार समर्थ, देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे, निकिन जोस, श्रेयस गोपाल, शरथ बीआर (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, वासुकी कौशिक, शुभांग हेगडे आणि विजयकुमार विशक.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.