भारताने दोनदा हातातली ICC Trophy गमावली; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची खंत

रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. सात वर्षे ते टीम इंडियाचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहिले. यादरम्यान टीम इंडियाला खूप यश मिळालं, पण या काळात टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

भारताने दोनदा हातातली ICC Trophy गमावली; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची खंत
Ravi Shastri

मुंबई : रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. सात वर्षे ते टीम इंडियाचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहिले. यादरम्यान टीम इंडियाला खूप यश मिळालं. भारतीय संघ नंबर वन बनला. ऑस्ट्रेलियात दोनदा कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. पण रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. यादरम्यान टीम इंडिया 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचली, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला आणि टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या सुपर-12 स्टेजमधून बाहेर संघ बाहेर पडला. रवी शास्त्री म्हणतात की, भारताला 2019 चा वर्ल्ड कप आणि 2021 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जिंकण्याची चांगली संधी होती. तेव्हा भारत विजयाच्या खूप जवळ होता. (Ravi Shastri says we had a chance to win ICC Trophy in 2019 world cup and WTC final)

न्यू इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या संभाषणात रवी शास्त्री म्हणाले, ‘मी म्हणेन की हा संघ माझ्या कार्यकाळात दोन आयसीसी विजेतेपद जिंकण्यास पात्र होता. हे मी प्रत्येक वेळी सांगेन. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फैसला केवळ एका सामन्याने झाला, हे मला पटलं नाही. मला नेहमी वाटते की, हा निर्णय योग्य नाही कारण पाच वर्षे संघ पहिल्या क्रमांकावर होता. माझ्यासाठी ही सर्वात मोठी निराशा होती कारण आम्ही आयसीसी ट्रॉफी मिळवण्यासाठी सामनाही ड्रॉदेखील करु शकलो नाही. 2019 च्या विश्वचषकात आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलो. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असल्याने वातावरण पूर्णपणे बदलले होते.

2019 वर्ल्डकप आणि WTC Final मध्ये भारत ट्रॉफीच्या जवळ पोहोचला

रवी शास्त्री म्हणाले की, भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नसली तरी या काळात जगाच्या कानाकोपऱ्यात विजय मिळवला आहे.

शास्त्री म्हणाले की, आम्ही ODI-T20 मध्ये सर्व संघांना त्यांच्या घरात घुसून पराभूत केले. आम्ही प्रत्येक संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत केले. जेव्हा तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये 70 टक्के सामने जिंकता तेव्हा तुम्ही बेस्टच असता. आम्ही दोन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचलो, मात्र तशी कामगिरी करता आली नाही. आम्ही जगभर विविध देशांमध्ये विजय मिळवले. असा विक्रम फक्त एकाच संघाकडे असू शकतो आणि तो म्हणजे ऑल ब्लॅक्स (न्यूझीलंड रग्बी संघ). त्यामुळे लोभी असणे ही एक गोष्ट आहे आणि अती लोभी असणे ही दुसरी गोष्ट आहे. आणि हेदेखील खरं आहे की, ICC विजेतेपद न मिळणे माझ्यासाठी निराशाजनक आहे, मला त्याची खंत आहे. 2019 विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिप फायनल अशा दोन संधी आमच्या हातात आल्या. पण आम्हाला आयसीसी चषक उंचावता आला नाही.

इतर बातम्या

IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रोहितचं अर्धशतक, हर्षल-अक्सरची उत्कृष्ट गोलंदाजी, भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

(Ravi Shastri says we had a chance to win ICC Trophy in 2019 world cup and WTC final)

Published On - 4:49 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI