IPL 2021 : मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार?, विराट कोहलीकडून RCB च्या युवा बोलर्सचं तोंडभरुन कौतुक

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आरसीबीच्या युवा गोलंदाजांचं कौतुक करत त्यांची तोंडभरुन स्तुती केली आहे. त्यामुळे कर्णधाराच्या शब्दाला जागून आरसीबीचे गोलंदाज तुफान फॉर्मात असलेल्या मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार का, हे पाहणे अतिशय रोमांचक ठरणार आहे. | Virat Kohli

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:06 AM, 9 Apr 2021
IPL 2021 : मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार?, विराट कोहलीकडून RCB च्या युवा बोलर्सचं तोंडभरुन कौतुक
Virat kohli

चेन्नई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रेड आर्मी रॉयल चॅलेजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना हिटमॅन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी होणार आहे. आरसीबीची बॅटिंग लाईन तगडी आहेच शिवाय गोलंदाजीमध्ये आरसीबी संघात मिश्रण पाहायला मिळतंय. तसंच आरसीबीच्या बोलिंगमध्ये युवा खेळाडूंचा दम पाहायला मिळणार आहे. कर्णधार विराट कोहलीने आरसीबीच्या युवा गोलंदाजांचं कौतुक करत त्यांची तोंडभरुन स्तुती केली आहे. त्यामुळे कर्णधाराच्या शब्दाला जागून आरसीबीचे गोलंदाज तुफान फॉर्मात असलेल्या मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार का, हे पाहणे अतिशय रोमांचक ठरणार आहे. (RCB Captain Virat Kohli Appriciate Mohammed Siraj Washington Sundar Navdeep Saini performance Mi vs RCB Opening match)

सिराज-सुंदर जोडीमध्ये आत्मविश्वास

मोहम्मद सिराज आणि वॉश्गिंटन सुंदर हे दोघेही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळले. या मालिकेत त्यांना जास्त संधी मिळाली नसली तरी मिळालेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर वापर करुन घेतला. तसंच संघ सहकाऱ्यांशी सोबत राहत सिराज-सुंदर जोडीने सिनियर्स खेळाडूंकडून मार्गदर्शन घेतलं. “भारतीय संघात खेळून त्यांच्याकडे आता उत्तम आत्मविश्वास आला आहे. हाच आत्मविश्वास येणाऱ्या काळात आरसीबीच्या कामी येईल”, असा विश्वास कर्णधार कोहलीने व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणं फायद्याचं

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणं कधीही फायद्याचं असतं. माझ्याही युवा काळात मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्याने आयपीएलदरम्यान याचा मला खूप फायदा झाला. गेल्या काही महिन्यांत सिराज आणि सुंदर भारतीय संघात खेळत आहेत. त्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा फायदा होईल, असं विराट म्हणाला.

टीमला मोठी मदत होईल

कोहली म्हणाला, “युवा खेळाडू म्हणून आंतराराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट आयपीएल खेळण्यासाठी मदत करतं. तुम्हाला एक आत्मविश्वास येत असतो तसंच चांगलं प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला तुमच्यावर सर्वाधिक विश्वास असायला लागतो.नवदीप, सिराज आणि युजीला मी गेल्या अनेक काळापासून ओखळतो. त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे तसंच प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडण्याची त्यांच्या बोलिंगमध्ये क्षमता आहे. आरसीबी संघाला त्यांच्या निश्चित फायदा होईल ”

मुंबई विरुद्ध बंगळुरु सलामीचा सामना

आयपीएलच्या 14 पर्वाला आज थाटात सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघादरम्यान पार पडणार आहे. आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

(RCB Captain Virat Kohli Appriciate Mohammed Siraj Washington Sundar Navdeep Saini performance Mi vs RCB Opening match)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबईविरुद्ध पहिलीच मॅच, विराट कोहलीचं मॅचअगोदर ट्विट, संघ पाठीराख्यांना म्हणतो…

IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!