RCB चा चतूर चहलला टाटा बाय-बाय, वाढीव पैशांवरुन फिस्कटलं अन संघातलं स्थान गमावलं?

IPL 2022 पूर्वी रिटेन केलेल्या (संघात कायम ठेवलेले) आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी सर्व 8 जुन्या संघांना आज जाहीर करावी लागणार आहे. बहुतांश संघांची रिटेन्शन लिस्ट जवळपास ठरली आहे.

RCB चा चतूर चहलला टाटा बाय-बाय, वाढीव पैशांवरुन फिस्कटलं अन संघातलं स्थान गमावलं?
Yuzvendra Chahal - RCB

मुंबई : IPL 2022 पूर्वी रिटेन केलेल्या (संघात कायम ठेवलेले) आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी सर्व 8 जुन्या संघांना आज जाहीर करावी लागणार आहे. बहुतांश संघांची रिटेन्शन लिस्ट जवळपास ठरली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीने त्यांच्या संघातील तीन ते चार मॅचविनर खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. तर काही फ्रेंचायझींनी फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना संघमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (RCB may not retain Yuzvendra Chahal for IPL 2022)

आयपीएल 2021 पर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाला आगामी हंगामात नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, त्यांचा आघाडीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल नवीन संघाचा भाग बनू शकतो. कारण आरसीबी चहलला संघात कायम ठेवणार नाही. हा संघ केवळ विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या दोनच खेळाडूंना संघात कायम ठेवणार आहे. तसेच जलदगती गोलंदाज हर्षल पटेलच्या नावाचा विचार फ्रेंचायझी करत आहे.

आरसीबी संघ विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या बलाढ्य खेळाडूंना त्यांच्यासोबत कायम ठेवणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून कोहली आरसीबीचा भाग आहे. तर ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी घेण्यात आले होते. त्यानंतर आयपीएल 2021 मध्येही त्याने चांगला खेळ दाखवला. एबी डिव्हिलियर्सही निवृत्त झाल्यामुळे तो आरसीबीमधून बाहेर पडला आहे. डिव्हिलियर्सच्या जाण्याने मॅक्सवेलला संघात कायम ठेवण्याची शक्यता वाढली आहे. एबीडी बराच काळ या संघाचा भाग होता.

रिटेन्शन रक्कमेवरुन फिस्कटलं

टाइम्स ऑफ इंडियाने आयपीएलच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, युजवेंद्र चहल संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंचा भाग असणार नाही. त्याच्यात आणि व्यवस्थापनात सुरु असलेली चर्चा आता थांबली आहे. हे प्रकरण रिटेन्शन रकमेवर अडकल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत चहलने लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयपीएल 2018 मध्ये आरसीबीने कोहलीसह चहलला संघात कायम ठेवले होते. यावेळी मात्र त्याची पुनरावृत्ती होऊ शकलेली नाही. आरसीबी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही संघात कायम ठेवू शकते, असे बोलले जात आहे. मात्र त्याची शक्यता कमी आहे.

चहलची आयपीएल कारकीर्द

आरसीबीने चहलला रिटेन केलं नाही तर हा खेळाडू आयपीएल 2022 मध्ये नवीन संघाकडून खेळताना दिसेल. युजवेंद्र चहल आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. 2011 ते 2013 पर्यंत तो मुंबई संघाचा भाग होता. यानंतर, तो 2014 ते 2021 पर्यंत आरसीबीकडून खेळला आणि प्रत्येक हंगामात तो संघाचा महत्त्वाचा गोलंदाज होता. चहलच्या नावावर 114 IPL सामन्यात 139 विकेट्स आहेत. 25 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

इतर बातम्या

IPL Retention: कोहली, धोनी, रोहित ते ऋतुराज…. रिटेंशनसाठी या खेळाडूंची नावं कन्फर्म, राहुल-वॉर्नर लिलावात उतरणार

IPL 2022 Retention Live Stream: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं रिटेंशन कधी, कुठे आणि कसं पाहणार?

आफ्रिकन देशांसाठी भारताचं मोठं पाऊल, केविन पीटरसनही भारावला, भारतीयांचं कौतुक करत नरेंद्र मोदींचे मानले आभार

Ipl : आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याचा स्पप्नभंग होणार? अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन?

(RCB may not retain Yuzvendra Chahal for IPL 2022)

Published On - 1:27 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI