AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajat patidar ipl 2022: विवाह ठरला, हॉल बुक झाला, मात्र रजत पाटीदारने ठरवलं, आधी लग्न…..

IPL 2022 मधील एलिमिनेटरचा सामना लक्षात राहिलं, तो रजत पाटीदारमुळे. (Rajat Patidar) काल इडन गार्डन्सवर रजतची बॅट सुसाट तलवारीप्रमाणे चालली. त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या एकाही गोलंदाजाला दया-माया दाखवली नाही.

Rajat patidar ipl 2022:  विवाह ठरला, हॉल बुक झाला, मात्र रजत पाटीदारने ठरवलं, आधी लग्न.....
RCB Rajat Patidar Image Credit source: instagram
| Updated on: May 26, 2022 | 6:28 PM
Share

मुंबई: IPL 2022 मधील एलिमिनेटरचा सामना लक्षात राहिलं, तो रजत पाटीदारमुळे. (Rajat Patidar) काल इडन गार्डन्सवर रजतची बॅट सुसाट तलवारीप्रमाणे चालली. त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या एकाही गोलंदाजाला दया-माया दाखवली नाही. चौफेर फटकेबाजी करत लखनौची गोलंदाजी फोडून काढली. रजत पाटीदारच्या नाबाद 112 धावांच्या शतकी खेळीच्या बळावरच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनौ सुपर जायंट्सवर (RCB vs LSG) विजय मिळवला. आता क्वालिफायर 2 मध्ये RCB चा सामना राजस्थान विरुद्ध होणार आहे. बुधवारी रजत पाटीदारची बॅटिंग बघून सगळेच हैराण झाले. आरसीबीने या प्लेयरला ऑक्शनमध्ये का विकत घेतलं नाही? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. रजतची फलंदाजी पाहून सर्वच दंग झाले. पण त्याची आणखी एक कहाणी चाहत्यांना हैराण करुन सोडेल. तुम्हाला माहित नसेल, पण मन मोडल्यानंतर रजत पाटीदार लग्न करणार होता. लग्नाची सगळी तयारी पण झाली होती. पण एक बातमीमुळे सर्व थांबलं.

कोणी विकत घेतलं नाही, त्यामुळे रजत पाटीदारचं मन मोडलं

रजत पाटीदारला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये कोणी विकत घेतलं नाही. त्यामुळे रजत पाटीदारचं मन मोडलं. तो निराश झाला. त्याच्या टॅलेंटला आयपीएल सारखा मंच मिळाला नाही. त्यानंतर रजतच्या कुटुंबाने त्याच्या लग्नाचा निर्णय घेतला. रजतचं लग्न या महिन्यात होणार होतं. कारण या महिन्यात कुठला क्रिकेटचा सामना नव्हता. “रजत पाटीदारचं रतलाम मधल्या एका मुलीबरोबर लग्न ठरलं होतं. 9 मे रोजी लग्न होतं. इंदोरमध्ये हॉटेल बुक केलं होतं. एक छोटासा सोहळा होता” असं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने रजतचे वडील मनोहर पाटीदार यांच्या हवाल्याने दिलं.

कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये गुंतलं होतं

रजत पाटीदारचं कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये गुंतलं होतं. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू लवनीत सिसोढियाला दुखापत झाली. तो स्पर्धेतून बाहेर गेला. त्याच्याजागी आरसीबीने रजत पाटीदारची निवड केली. निवड झाल्याचे समजल्यानंतर रजत प्रचंड आनंदात होता. त्याने मे महिन्यात होणार लग्नं पुढे ढकललं व खेळण्यासाठी थेट बँगलोरच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. आज रजत पाटीदारने आपली क्षमता सर्वांनाच दाखवून दिलीय. RCB ने त्याला फक्त 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.