IPL 2022 ऑक्शनमध्ये कोणी बोली लावली नाही, मध्येच रिप्लेसमेंट म्हणून आला, एका इनिंगमध्ये स्टार बनून गेला, Rajat patidar ची गोष्ट

Rajat Patidar IPL 2022: कोणाचं नशीब कधी चमकेल, कोणाचे दिवस कधी पालटतील, याचा कधीच ठोस अंदाज बांधता येत नाही. खेळाच्या दुनियेत अनेकदा हे पहायला मिळतं. एखादा स्टार खेळाडू झिरो होतो, तर एखादा छोटासा खेळाडू हिरो बनून जातो.

May 26, 2022 | 12:52 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 26, 2022 | 12:52 PM

कोणाचं नशीब कधी चमकेल, कोणाचे दिवस कधी पालटतील, याचा कधीच ठोस अंदाज बांधता येत नाही. खेळाच्या दुनियेत अनेकदा हे पहायला मिळतं. एखादा स्टार खेळाडू झिरो होतो, तर एखादा छोटासा खेळाडू हिरो बनून जातो. यंदाच्या आयपीएलमध्ये रजत पाटीदारच्या बाबतीत हे घडलय.

1 / 10
IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ दुसरा क्वालिफायरचा सामना खेळणार आहे, ते केवळ रजत पाटीदारमुळे. काल झालेल्या सामन्यात RCB ने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला. याच रजत पाटीदारला 50 दिवस आधी कोणी विचारतही नव्हतं.

2 / 10
काल इडन गार्डन्सवर 60 हजार प्रेक्षकांसमोर रजत पाटीदारने जोरदार बॅटिंग केली. आपल्या फलंदाजीने त्याने क्रिकेट रसिकांचं मनोरंजन केलं. रजत पाटीदारने 54 चेंडूत नाबाद 112 धावा ठोकल्या. यात 12 चौकार आणि 7 षटकार आहेत.

3 / 10
यंदाच्या सीजनमधली रजत पाटीदारची बँगलोरसाठी ही तिसरी महत्त्वाची इनिंग होती. याआधीच्या दोन इनिंगमध्ये त्याच्या खेळीमुळे बँगलोरला विजय मिळाला नव्हता.

4 / 10
रजत पाटीदार मागच्या सीजनपर्यंत बँगलोर फ्रेंचायजीचाच भाग होता. पण मेगा ऑक्शनमुळे त्याला रिटेन केलं नव्हतं.

5 / 10
मेगा ऑक्शनमध्ये बँगलोर किंवा दुसरी कुठली टीम रजत पाटीदारवर बोली लावेल, असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शनमध्ये दोन वेळा त्याचं नाव पुकारण्यात आलं. पण कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही.

6 / 10
बँगलोरने यंदाच्या लिलावात कर्नाटकचा युवा फलंदाज लवनीत सिसोदीयाला विकत घेतलं. पण स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यातच त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला.

7 / 10
त्यावेळी RCB ला रजत पाटीदारची आठवण झाली व त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला आरसीबीने विकत घेतलं. नशीब फिरलं ते इथचं. नशिबाने पाटीदारला साथ दिली आणि पाटीदारने बँगलोरला. आज निकाल सर्वांसमोर आहे.

8 / 10
आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा रजत पाटीदार आरसीबीचा पहिला फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 6 डावात 275 धावा केल्या आहेत. 156 च्या स्ट्राइक रेटने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे.

9 / 10
रजत पाटीदार मध्य प्रदेश इंदूरचा आहे. त्याने फर्स्ट क्लासच्या 39 सामन्यात 2588 धावा केल्या आहेत. यात 7 शतक आणि 14 अर्धशतक आहेत.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें