AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT, Qualifier 1: नाणेफेकीचा कौल गमावताच आरसीबीचा पराभव? गुजरात टायटन्सला असा फायदा

IPL 2026 Qualifier 1: आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. यासह गुजरात टायटन्सच्या विजयाची शक्यता वाढली आहे. कसं आणि का ते जाणून घ्या.

RCB vs GT, Qualifier 1: नाणेफेकीचा कौल गमावताच आरसीबीचा पराभव? गुजरात टायटन्सला असा फायदा
RCB vs GT, Qualifier 1: नाणेफेकीचा कौल गमावताच आरसीबीचा पराभव? गुजरात टायटन्सला असा फायदाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2026 | 8:06 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरातने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गुजरात टायटन्सच्या विजयाची शक्यता वाढली आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याचं्यात एकूण 8 सामने खेळले गेले आहे. प्रत्येकवेळी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळालं. आयपीएल 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 मध्येही असंच घडलं आहे. पण धर्मशाळेतील मैदानाचं गणित काही वेगळं आहे. येथे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघही जिंकू शकतो. पहिल्या डावात 210 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तर त्या गाठणं कठीण जातं. धर्मशाळेतील या मैदानात 2023 नंतर आतापर्यंत 6 नाईट सामने खेळले गेले. यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 3 वेळा आणि धावांचा पाठलाग करणारा संघ तीन वेळा जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 210 पेक्षा जास्त धावा केल्या तर विजय मिळाला आहे हे महत्त्वाचं आहे.

नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय, पण आपण पाहिलंय आणि विशेषतः या मैदानावर, दुसऱ्या डावात थोडं दव पडतं, त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणं नेहमीच चांगलं असतं. मला वाटतं, हा सामना पूर्णपणे खेळातील समीकरणे काढून टाकण्याबद्दल आहे. आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळत आहोत आणि आशा आहे की आम्ही ते पुढेही चालू ठेवू. मी 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील काळात इथे खूप खेळलो आहे. मी इथे बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे हो, आशा आहे की याचा आम्हाला चांगला उपयोग होईल. आणि हो, हे जगातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक आहे. आमच्या संघात एक बदल आहे. अर्शद खानच्या जागी कुलवंत संघात आला आहे.’

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर, मला वाटतं खेळपट्टी खूप चांगली दिसतेय. ती बरीच कठीण आहे. चेंडू बॅटवर चांगला येईल, त्यामुळे मला वाटतं की 40 षटकांत त्यात काही बदल होणार नाही. म्हणून आम्ही एक चांगली धावसंख्या उभारण्याचा आणि त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की हा सामना जिंकल्यानंतर थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी पहिला क्वालिफायर सामना एक चांगला पर्याय आहे, पण आम्ही सध्या एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही या सामन्यात आमचं सर्वोत्तम देऊ. मला वाटतं की आम्ही चांगला क्रिकेट खेळलो आहोत आणि आम्ही प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आमच्या ताकदीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत.’

Follow Us
चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
Rupali Thombre Patil : 'आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही', चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द
Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?