RCB vs SRH Live Score, IPL 2021 : हैद्राबाद विजयी, अवघ्या 4 धावांनी सामना घातला खिशात

RCB vs SRH Live Score in Marathi: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) आणि केन विल्यमसनच्या सनरायजर्स हैद्राबाद (SRH) या संघामध्ये पार पडला.

RCB vs SRH Live Score, IPL 2021 : हैद्राबाद विजयी, अवघ्या 4 धावांनी सामना घातला खिशात
आरसीबी विरुद्ध हैद्राबाद सामन्यातील एक क्षण

आज यंदाच्या पर्वातील 51 वा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघामध्ये  अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे.तरीदेखील आजचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. ज्यात हैद्राबादने अखेर 4 धावांनी विजय मिळवला.

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराटने गोलंदाजी निवडली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैद्राबाद संघाकडून सुमार फलंदाजी झाली. कर्णधार केन विल्यमसन (31) आणि जेसन रॉयच्या (44) भागिदारीच्या जीवावर हैद्राबादने 141 धावांपर्यंत मजल मारली. पण आरसीबीला हे आव्हान पेलता आले नाही. मॅक्सवेल (40) आणि देवदत्त यांनी (41) यांनी चांगली झुंज दिली. पण अखेरच्या षटकात 13 धावा न करता आल्याने आरसीबी 4 धावांनी पराभूत झाली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 06 Oct 2021 23:21 PM (IST)

  RCB vs SRH: आरसीबी थोडक्यात पराभूत

  शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना आरसीबीचा संघ केवळ 9 धावाच करु शकला. ज्यामुळे हैद्राबादचा संघ 4 धावांनी विजयी झाला आहे.

 • 06 Oct 2021 23:12 PM (IST)

  RCB vs SRH: शाहबाजही बाद

  आरसीबीचा सहावा गडी शाहबाज अहमदही होल्डरच्या षटकात बाद झाला आहे. आता आऱसीबीला एका षटकात 13 धावांची गरज आहे.

 • 06 Oct 2021 23:07 PM (IST)

  RCB vs SRH: पड्डीक्कलचं अर्धशतकही हुकलं

  img

  आरसीबीचा डाव सांभाळणारे देवदत्त पडीक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल दोघेही बाद झाले आहेत. मॅक्सवेल 40 तर पड्डीक्कल 41 धावा करुन बाद झाला आहे.

 • 06 Oct 2021 22:56 PM (IST)

  RCB vs SRH: मॅक्सवेल 40 धावा करुन बाद

  आरसीबीचा डाव पडीक्कलसोबत मिळून सांभाळणारा ग्लेन मॅक्सवेल धावचीत झाला आहे. आरसीबीला विजयासाठी अजूनही 4 ओव्हरमध्ये 38 धावांची गरद आहे.

 • 06 Oct 2021 22:34 PM (IST)

  RCB vs SRH: मॅक्सवेलने पड्डीकल सोबत सांभळला डाव

  तीन गडी बाद झाल्यानंतर आरसीबीची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. मॅक्सवेल-पड्डीकल जोडीने आरसीबीचा डाव सांभाळला आहे.

 • 06 Oct 2021 22:07 PM (IST)

  RCB vs SRH: उम्रान मलिकने टीपली ‘पहिली’ विकेट

  img

  मागील सामन्यातच हैद्राबाद संघात पदार्पण करणाऱ्या काश्मिरच्या उम्रान मलिकेने त्याची आयपीएलमधील पहिली विकेट केएस भरतच्या रुपात घेतली आहे.

 • 06 Oct 2021 21:52 PM (IST)

  RCB vs SRH: डॅनियलही बाद!

  img

  कर्णधार विराटनंतर डॅनियल क्रिस्टियनही बाद झाला आहे. सिद्धार्थ कौलच्या चेंडूवर कर्णधार विल्यमसनने त्याचा झेल घेतला आहे.

 • 06 Oct 2021 21:43 PM (IST)

  RCB vs SRH: विराट कोहली आऊट!

  img

  141 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबीची सुरुवाक खराब झाली आहे. कर्णधार विराट कोहली केवळ 5 धावा करुन बाद झाला आहे. भुवनेश्वरने त्याला पायचीत केलं आहे.

 • 06 Oct 2021 21:17 PM (IST)

  RCB vs SRH: हैद्राबादची 141 धावापर्यंत मजल

  कर्णधार केन विल्यमसन (31) आणि जेसन रॉयच्या (44) भागिदारीच्या जीवावर हैद्राबादने 141 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 142 धावा करायच्या आहेत.

 • 06 Oct 2021 21:03 PM (IST)

  RCB vs SRH: हैद्राबादचा यष्टीरक्षक साहाही बाद

  img

  हैद्राबादचा सहावा गडी यष्टीरक्षक रिद्धिमान साहाच्या रुपात बाद झाला आहे. 10 धावा केल्यानंतर हर्षल पटेलच्या चेंडूवर एबीडीने त्याची झेल घेतली आहे.

 • 06 Oct 2021 20:49 PM (IST)

  RCB vs SRH: अब्दुल समद पायचीत

  img

  हैद्राबादचा युवा खेळाडू अब्दुल समद पायचीत झाला आहे. चहलच्या फिरकीवर तो बाद झाला आहे.

 • 06 Oct 2021 20:48 PM (IST)

  RCB vs SRH: जेसन रॉयचं अर्धशतक हुकलं

  img

  हैद्राबादचा सलामीवीर जेसन रॉय 44 धावा करुन बाद झाला आहे. डॅनियल क्रिस्टीनने त्याची विकेट घेतली आहे.

 • 06 Oct 2021 20:42 PM (IST)

  RCB vs SRH: विल्यमसनपाठोपाठ प्रियम गर्गही बाद

  img

  सनरायजर्स हैद्राबादचे दोन गडी काही अंतरात बाद झाले आहेत. विल्यमसन 31 आणि प्रियम गर्ग 15 धावा करुन बाद झाला आहे.

 • 06 Oct 2021 20:22 PM (IST)

  RCB vs SRH: विल्यमसन आणि रॉय जोडीने सांभाळला डाव

  हैद्राबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसनने उत्तम भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला आहे. दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली असून 11 ओव्हरनंतर हैद्राबादचा 81 वर 1 बाद असा आहे.

 • 06 Oct 2021 19:52 PM (IST)

  RCB vs SRH: अभिषेक शर्मा आऊट!

  img

  हैद्राबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाला आहे. 13 धावा होताच जियॉर्ज गार्टनच्या चेंडूवर मॅक्सवेलने त्याचा झेल घेतला आहे.

 • 06 Oct 2021 19:36 PM (IST)

  RCB vs SRH: हैद्राबादचे सलामीवीर मैदानात

  हैद्राबादने फलंदाजीने खेळाची सुरुवात केली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि जेसन रॉय मैदानात आले आहेत.

 • 06 Oct 2021 19:06 PM (IST)

  SRH अंतिम 11

  जेसन रॉय , रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक

 • 06 Oct 2021 19:05 PM (IST)

  RCB अंतिम 11

  विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन, डॅनियल क्रिस्टियन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

   

 • 06 Oct 2021 19:04 PM (IST)

  हैद्राबादची प्रथम फलंदाजी

  सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी निवडली आहे.

 • 06 Oct 2021 19:04 PM (IST)

  बंगळुरु विरुद्ध हैद्राबाद

  आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि हैद्राबाद हे संघ 19 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये हैद्राबाद संघाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा संघ 8 वेळाच विजय मिळवू शकला आहे. तर एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI