AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखीव असलेल्या शुबमन गिलने पहिल्या सराव शिबिरात केली ओपनिंग, तीन तासात काय घडलं? ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. न्यूयॉर्कच्या नैसो काउंटीमध्ये आयजनहावर पार्क स्टेडियममध्ये सामना होणार आहे. यासाठी टीम इंडियाने या स्टेडियमपासून काही किलोमीटर अंतरावर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सराव शिबीरात तीन तास घाम गाळला.

राखीव असलेल्या शुबमन गिलने पहिल्या सराव शिबिरात केली ओपनिंग, तीन तासात काय घडलं? ते जाणून घ्या
| Updated on: May 30, 2024 | 3:58 PM
Share

आयसीसी जेतेपदाचं गेल्या काही वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यासाठी टीम इंडिया अमेरिकेत चार दिवसांपूर्वीच पोहोचली आहे. अमेरिकेतील वातावरणाशी जुळवत हळूहळू सराव सुरु केला आहे. भारतीय संघाने एक दिवस आधी हलका व्यायाम केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेटमध्ये घाम गाळला. कर्णधार रोहित शर्मासहित सर्वच खेळाडूंनी 3 तास जोरदार सराव केला. नेटमध्ये जोरदार फटकेबाजी करत वातावरणाचा अंदाज घेतला. तसेच गोलंदाजांनी अचूक टप्प्याचा मारा केला. या सराव शिबिरात चार खेळाडूंनी भाग घेतला नाही. टीम इंडियाने न्यूयॉर्कच्या नैसो काउंटीच्या गार्डन सिटी विलेजमध्ये थांबली आहे. तिथेच सराव शिबीर सुरु आहे. इथूनच काही किलोमीटर अंतरावर आयजनहावर पार्क स्टेडियम आहे. इथेच टी20 वर्ल्डकप सामना होणार आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्यासाठी टीम इंडियाने याच भागात सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी टीम इंडियाने वॉर्मअप एक्सरसाईज केली. धावणं आणि फुट वॉली खेळत थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला. बुधवारपासून टीम इंडियाचं सराव शिबीर खऱ्या अर्थाने सुरु झालं आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, सराव शिबीर मुख्य मैदानापासून 8 ते 9 किलोमीटर दूर आहे. कँटिएग पार्कमध्ये तयार केलेल्या प्रॅक्टिस पिचवर भारतीय संघाने 3 तास घाम गाळला. ही जागा आयसीसीकडून सराव शिबीर म्हणून दिली गेली आहे.

नेटमध्ये भारतीय फलंदाजांनी बॅटिंग ऑर्डरप्रमाणे फलंदाजी केली. सर्वात आधी कर्णधार आणि ओपनर रोहित शर्मा उतरला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत यशस्वी जयस्वाल ऐवजी शुबमन गिल उतरला होता. शुबमन गिल हा राखीव खेळाडू आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने बॅटिंग केली. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या नेट गोलंदाजांनी भारतील फलंदाजांना गोलंदाजी केली.

इतकंच काय तर मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव यांनी फलंदाजी केली. टीम इंडियाला स्पर्धेत फलंदाजीत डेप्थ हवी असल्याने त्यांनीही सराव केला. यशस्वी जयस्वाल सराव शिबीरात नव्हता कारण त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्पात यशस्वी अमेरिकेत आला आहे. दोन दिवसांपूर्वीच टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे यशस्वीसह संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि रिंकू सिंह सराव शिबिरात उतरले नाहीत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.