AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना रिंकु सिंह आणि नितीश कुमार रेड्डी यांना टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणं कठीण असल्याचं दिसत आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Dec 03, 2025 | 7:23 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन टी20 मालिकेत एकूण दहा सामने खेळणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी लिटमस टेस्ट आहेत. त्यामुळे या मालिकेत खेळणारे खेळाडूच टी20 वर्ल्डकपमध्ये खेळतील यात काही शंका नाही. यात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या संघात शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचं कमबॅक झालं आहे. दोघांनी दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन केलं आहे. शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. त्यामुळे तो संघाचा भाग असेल यात काही शंका नाही. पण त्याच्या नावापुढे स्टार लावला आहे. त्यामुळे खेळणार की नाही हे फिटनेसवर अवलंबून असेल.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियासाठी निवडलेल्या टी20 संघच कायम ठेवला आहे. हार्दिक पांड्याबाबत एकमेव बदल करण्यात आला आहे दुसरीकडे, या संघातून रिंकु सिंहला डच्चू दिला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघातही नसेल अशी आता चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियातील टी20 मालिकेत रिंकूला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण हा सामना देखील पावसामुळे सामना रद्द झाला होता. रिंकु सिंह व्यतिरिक्त नितीश कुमार रेड्डी यालाही या संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणार नाही अशी चर्चा रंगली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही हाच संघ खेळेल यात काही शंका नाही. पण एखाद दुसरा खेळाडू जखमी झाला तर या दोघांचा विचार केला जाईल. त्यामुळे या दोन महिन्यात काय घडतं यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे सध्यातरी हाच संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धत खेळेल असंच बोललं जात आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार