रात्री 3 वाजले की रिंकु सिंहला का वाटते भीती? तासभर चुकूनही असं करत नाही
रिंकु सिंह हा भारतीय क्रिकेट विश्वातील फिनिशर म्हणून प्रसिद्धीस आला आहे. आयपीएल असो की टीम इंडियासाठी त्याने ही भूमिका बजावली आहे. गोलंदाजांना जराही दया दाखवत नाही. पण रिंकु सिंहला भीती वाटते. रात्री 3 ते 4 दरम्यान रिंकु सिंह नीट झोपतही नाही.

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना युएई विरुद्ध होत आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याची उत्सुकता आहे. रिंकु सिंह प्लेइंग 11 मध्ये असण्याची शक्यता आहे. पण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर काय ते स्पष्ट होईल. पण या सामन्यापूर्वी रिंकु सिंहने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्याला वाटत असलेल्या भीतीबाबत त्याने आपलं म्हणणं मांडलं आहे. भीती इतकी असते की रात्री 3 ते 4 दरम्यान झोपच लागत नाही. घरी असला तरी आणि बाहेर दौऱ्यावर असला तरी त्याला भीती सतावते. पण इतक्या ताकदीच्या फलंदाजाला नेमकी कसली भीती वाटते? त्याच्या भीतीची कारण एक नाही तर अनेक आहेत. पण त्याला भीती वाटते ती भुतांची.. हा खुलासा त्याने स्वत: केला आहे. रिंकु सिंहने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये भुतांबाबत असलेली भीती व्यक्त केली आहे.
रिंकु सिंहने सांगितलं की, त्याला भुतांची खूप भीती वाटते. त्यामुळे रात्री 3 ते 4 दरम्यान झोप लागत नाही. रिंकु सिंहच्या मते, रात्री 3 ते 4 ही वेळ भुतांची असते. त्यामुळेच रिंकु सिंह या कालावधीत झोपत नाही. इतकंच काय भुतांची भीती त्याच्या मनात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला अंधाराची भीती वाटते. त्यामुळे तो कधीच एकटा झोपत नाही. त्याच्या खोलीची लाइट रात्रभर सुरु असते. त्यामुळे विदेश दौऱ्यावर असलो की अडचणींचा सामना करावा लागतो. रिंकु सिंहने सांगितलं की, घरी तर मी एकटा झोपत नाही. विदेश दौऱ्यावर कोणत्या कोणत्या खेळाडूसोबत झोपतो. अशा वेळी कुलदीप सिंहला माझ्यासोबत ठेवतो.
रिंकु सिंहला फक्त भुतांची भीती वाटत नाही, तर इतरही कारणं आहे. त्यामुळे रिंकुच्या मनात भीतीने घर केलं आहे. रिंकुला खोल पाणी, उंचीची देखील भीती वाटते. त्याने पॉडकास्टमध्ये याबाबतच खुलासा केला आहे. मग रिंकु सिंहला कोणाची भीती वाटत नाही? असा प्रश्न पॉडकास्टमध्ये विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, मला गोलंदाजांची भीती वाटत नाही. रिंकु सिंहला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं तर त्याच्याकडून फार अपेक्षा असणार आहेत. कारण एकदा का त्याची बॅट चालली तर सामना संपवण्याची ताकद त्याच्यात आहे.
