AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंत पुनरागमन करण्यासाठी सज्ज? इन्स्टाग्रामवर व्हिडिओ केला शेअर

Rishabh pant : ऋषभ पंत हा लवकरच चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आशा नक्कीच वाढल्या आहेत. पंतच्या गाडीला अपघात झाल्याने तो बराच काळ क्रिकेट पासून दूर आहे. पण आता तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे.

ऋषभ पंत पुनरागमन करण्यासाठी सज्ज? इन्स्टाग्रामवर व्हिडिओ केला शेअर
Pant
| Updated on: Dec 06, 2023 | 3:43 PM
Share

Rishabh pant video : भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत लवकरच मैदानावर दिसण्याची शक्यता आहे. पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. ऋषभ पंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. पंत आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंत कार अपघात झाला होता जखमी

30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. त्यामुळे बरेच दिवस तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. पंत आता पुनरागमन करण्यासाठी तयार होत आहे. त्याचा जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत आयपीएल 2024 खेळणार

ऋषभ पंत आयपीएल 2024 साठी पुनरागमन करू शकतो अशी चाहत्यांना आशा आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मेंटर सौरव गांगुली याने सांगितले होते की पंत आता ठीक आहे आणि तो आयपीएलमध्ये खेळेल. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही करेल.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

2023 मध्ये दिल्लीची कामगिरी

पंतच्या अनुपस्थितीत, डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाच दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अत्यंत वाईट होती. आयपीएलच्या गेल्या मोसमातून बाहेर पडणारा दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ होता. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सने 9व्या स्थानावर आपला प्रवास संपवला. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी 5 सामने जिंकले, तर 9 सामने गमावले होते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.