IPL : दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी, बीसीसीआयचा ‘तो’ एक निर्णय अन् रिषभ पंतची IPL मध्ये एन्ट्री!
भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

मुंबई : आयपीएलचं 16 पर्व (IPL 2023) येत्या 31 मार्च पासून सुरु होत आहे. अशातच भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंतच्या (RishabhPant) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रिषभ पंतचा मागील वर्षी 31 डिसेंबरला अपघात झाला होता. अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो अजूनही क्रिकेट पासून अजूनही दूर आहे. पंतला अजून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
पंतच्या अपघातामुळे यंदा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वार्नरकडे सोपवण्यात आली आहे. पंत यंद्याच्या मोसमात खेळणार नसला तरी तो दिल्लीच्या ड्रेसिंग रूम मध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी बीसीसीआय च्या एका निर्णयाची गरज आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्स चे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी सूचक वक्तव्य केलंय.
दिल्ली कॅपिटल्स घरगुती सामन्यांना रिषभ पंतला उपस्थित राहण्यासाठी विनंती करेल. मात्र याचा सर्वस्वी निर्णय बीसीसीआय च्या हातात असल्याचं धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं. युवा खेळाडूंना प्रोसाहित करण्यासाठी पंतला मैदानात आणणार का?, यावर बोलताना पंतला बोलावण्याचा पूर्णपणे प्लॅन आहे. बीसीसीआयने फक्त तेवढी सूट दिली पाहिजे, असं मल्होत्रा म्हणाले.
पंतला बोलावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, फक्त बीसीसीआयने सूट दिली तर ते शक्य होईल. आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतचा फिटनेस असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं. याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनीही, पंतला दिल्लीच्या डगआउट मध्ये पाहायला आवडेल मात्र तो निर्णय बीसीसीआयच्या हातात असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे यावर आता बीसीसीआआय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, रिषभ पंतच्या चाहत्यांना देखील त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. रिषभ पंत हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू असून त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पहिलं जातं. अपघातामुळे रिषभ पंत सुरु असलेल्याला बॉर्डर गावस्कर मालिकेला मुकला असून आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळेल की नाही याबाबत संभ्रम आहे.
