Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण करणार विकेटकीपिंग? हेड कोच गंभीरने कुणाचं नाव घेतलं?
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असणार? प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऋषभ पंत की केएल राहुल? हेड कोच गौतम गंभीरने अखेर सांगितलंच.

टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करत 3-0 ने मालिका जिंकली. टीम इंडियाने अशाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी चमकदार कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. आता टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील 20 फेब्रुवारीला खेळताना दिसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांना संधी दिली आहे. मात्र दोघांपैकी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत अनेक क्रिकेट चाहत्यांना प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर हेड कोच गौतम गंभीर याने उत्तर दिलं आणि चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
केएल राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून पहिली पसंत असणार आणि ऋषभ पंतला पर्याय म्हणून प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्याबाबत इतक्यात विचार केला जाणार नसल्याचं गंभीरने स्पष्ट केलं. पंतला इंग्लंडविरुद्धच्या 3 पैकी एकाही एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही.पंत एकमेव असा खेळाडू ठरला ज्याला इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये संधी मिळाली नाही.
केएलची कामगिरी
केएलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात बॅटिंगसाठी सहाव्या स्थानी पाठवण्यात आलं. मात्र केएलला सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी संघर्ष करावा लागला. मात्र केएलला तिसऱ्या सामन्यात पाचव्या स्थानी पाठवण्यात आलं आणि फरक दिसला. केएलने 29 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. टीम इंडियाने हा सामना 142 धावांनी जिंकला.
गौतम गंभीर काय म्हणाला?
“केएल राहुल आमची विकेटकीपर म्हणून पहिली पसंती आहे. सध्या मी इतकंच सांगू शकतो. ऋषभ पंतला संधी मिळेल, मात्र आता केएल चांगलं करतोय तर आम्ही 2 विकेटकीपर फलंदाजांना एकत्र खेळवू शकत नाहीत”, असं हेड कोच गौतम गंभीर याने तिसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट केलं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.