AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Riyan Parag | रियान पराग याचं वादळी शतक, विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Riyan Parag Century | रियान पराग याने वादळी विस्फोटक खेळी करत धमाकेदार शतक ठोकत टीमसाठी निर्णायक भूमिका बजावली.

Riyan Parag | रियान पराग याचं वादळी शतक, विरोधकांना चोख प्रत्युत्तर
| Updated on: Jul 28, 2023 | 5:22 PM
Share

पुद्देचरी | टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात प्रतिष्ठेची देवधर ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील सातव्या सामन्यात नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन आमनेसामने होते. या सामन्यात ईस्ट झोनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र ईस्ट झोनची खराब सुरुवात झाली. ईस्ट झोनने झटपट 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम संकटात सापडली होती. मात्र टीम इंडिया एचा खेळाडू रियान पराग याने संकटमोचकाची भूमिका बजावली.

रियान पराग आणि कुमार कुशाग्रा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 235 धावांची विक्रमी भागीदारी केली. या पार्टनरशीपमुळे ईस्ट झोनने भरारी घेतली. तसेच या पार्टनरशीपमुळे ईस्ट झोनला 300 पार मजल मारता आली. ईस्ट झोनने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. त्यामुळे नॉर्थ झोनला विजयासाठी 338 धावांचं आव्हान मिळालं.

रियान पराग याचं शतक

आयपीएल आणि एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत रियान पराग याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसचे रियान नेटकऱ्यांसह टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. त्यामुळे त्याच्यावर सडकून टीका केली जाते. मात्र रियानने नॉर्थ झोन विरुद्ध शतक ठोकत टीकाकारांचं थोबाद बंद केलं. कुमार कुशाग्रा याच्यासोबतच्या विक्रमी भागीदारीदरम्यान रियानने अवघ्या 84 बॉलमध्ये शतक ठोकलं. रियानने या शतकासाठी 8 सिक्स आणि 4 चौकार ठोकले.

रियान शतक ठोकल्यानंतर आणखी आक्रमक झाला. रियाने मिळेल तिथे फटके मारले. रियानने स्पिनर आणि फास्टर न पाहता जोरदार फटकेबाजी केली. मात्र रियानच्या खेळीला 131 धावांवर ब्रेक लागला. मयंक यादव याने रियानला मनदीपच्या हाती कॅच आऊट केलं. रियानने 102 बॉलमध्ये 11 कडक सिक्स आणि 5 फोरसह 131 रन्स केल्या.

रियान व्यतिरिक्त कुमार कुशाग्रा याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र कुशाग्रा नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. कुशाग्राचं अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं. कुशाग्राने 87 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्ससह 98 धावा केल्या. तर शेवटच्या क्षणी मणिशंकर मुरासिंग याने 25 धावांची खेळी केली. मात्र इस्ट झोनच्या ओपनिंग आणि मिडल ऑर्डरने सपेशल निराशा केली.

नॉर्थ झोनकडून मयंक यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने 3 विकेट्स घेत मयंकला चांगली साथ दिली. तर संदीप शर्मा याच्या खात्यात 1 विकेट गेली.

नॉर्थ झोन प्लेईंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), हिमांशू राणा, मनदीप सिंग, निशांत सिंधू, शुभम रोहिल्ला, हर्षित राणा, मयंक मार्कंडे, संदीप शर्मा आणि मयंक यादव.

इस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | सौरभ तिवारी (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, उत्कर्ष सिंग, रियान पराग, विराट सिंग, सुभ्रांशु सेनापती, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मुख्तार हुसेन, आकाश दीप आणि मणिशंकर मुरासिंग.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.