Rohit Sharma: रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची UPDATE, जाणून घ्या कधी परतणार मैदानावर

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी (South Africa tour) रोहित शर्माची (Rohit sharma) वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची UPDATE, जाणून घ्या कधी परतणार मैदानावर
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 6:36 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी (South Africa tour) रोहित शर्माची (Rohit sharma) वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याशिवाय रोहितला कसोटी संघाचे उपकर्णधारही बनवण्यात आले होते. पण रोहितला मुंबईत सराव करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने तो या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. रोहित आता दुखापतीमधून सावरत असून पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज (West indies) विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या सहा सामन्यांमध्ये रोहित पुनरागमन करु शकतो.

NCA मध्ये रोहित काय करतोय?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्यापासून वनडे मालिका सुरु होणार आहे. वनडे मालिकेआधी रोहितचा फिटनेस तपासण्यात आला. पण रोहित पूर्णपणे फिट नसल्याने त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघात समावेश करण्यात आला नाही. “राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहितचा रिहॅबचा कार्यक्रम योग्य पद्धतीने सुरु आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत तो फिट होईल, अशी अपेक्षा आहे” असे बीसीसीआयमधील एका सूत्राच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिलं आहे.

रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत याआधी सुद्धा झाली होती. त्यामुळे 2020-21मध्ये रोहित ऑस्ट्रेलियात झालेल्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी झाला नव्हता. वेस्ट इंडिज दौऱ्याला अजून तीन आठवड्यांचा अवधी उरला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना सहा फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होईल. भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे सीरीज सहा ते 12 आणि टी-20 सीरीज 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होईल. बीसीसीआयच्या विद्यमान धोरणानुसार, प्रत्येक खेळाडूला फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागते. त्यानंतर निवड समितीला याबद्दल सांगितलं जातं.

(rohit sharma likely to be fit till west indies limited over series)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.