AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तूच खरा हिरो…” रोहित शर्मा नक्की कोणासाठी भावूक झाला?

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक काळजाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने टीम इंडियाचा माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप याची स्तुती केली आहे. त्याची मेहनत आणि संघाप्रती समर्पणासाठी आभार व्यक्त केले आहेत.

तूच खरा हिरो... रोहित शर्मा नक्की कोणासाठी भावूक झाला?
"तूच खरा हिरो..." रोहित शर्मा नक्की कोणासाठी भावूक झाला? Image Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2026 | 8:59 PM
Share

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. टीम इंडियासोबत केलेला करार संपुष्टात आला आहे. टी दिलीप यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा संघाची धुरा सांभाळली होती. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजयानंतर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या काळातही बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ तात्पुरता वाढवला. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर त्यांचा करार संपुष्टात आला असून, बीसीसीआयने तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंड आणि इंगिलंड दौऱ्यात भारताचं क्षेत्ररक्षण सुमार झालं होतं. त्यात पराभवामुळे कोचिंग सेटअप बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने टी दिलीप यांचा कार्यकाळ वाढवला नाही.

रोहित शर्माची इमोशनल पोस्ट

टी दिलीप यांच्या कार्यकाळात भारताने मोठं यश मिळवलं आहे हे विसरून चालणार नाही. 2024 आणि 2026 टी20 वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर 2023 आणि 2025 आशिया कप जिंकला आहे. टी दिलीप यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने वर्कहॉर्स म्हणजे कष्टाळू खेळाडू असा उल्लेख करत त्याच्या कार्यकाळाची स्तुती केली आहे. इन्स्टाग्रामवर दिलीप यांची प्रशंसा करताना रोहित शर्माने लिहिले, “तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहात, दिलीप गुरु. तुम्ही संघात जादू निर्माण केली आहे आणि पडद्यामागे कठोर परिश्रम करणारे खरे ‘वर्कहॉर्स’ आहात. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”

View this post on Instagram

A post shared by T Dilip (@dilip.tk19)

सुभदीप घोष यांची फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती

टी दिलीप यांचा करार संपल्यानंतर आता ही जबाबदारी बीसीसीआयने सुभदीप घोष यांच्या खांद्यावर टाकली आहे. सुभदीप घोष भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणार आहेत. सुभदीप घोष यांनी यापूर्वी भारतीय महिला संघ आणि इंडिया अ संघासोबत काम केलं आहे. आता त्यांचा कार्यकाळ श्रीलंका कसोटी मालिकेपासून सुरू होणार आहे.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश