AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Auqib Nabi: बुमराह आऊट, आकिब नबी इन! पण तरीही ‘या’ कारणामुळे बेंचवर बसावं लागणार?

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकला असून वेगवान गोलंदाज आकिब नबीला स्थान मिळालं आहे. पण त्याला खेळण्याची संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.

Auqib Nabi: बुमराह आऊट, आकिब नबी इन! पण तरीही 'या' कारणामुळे बेंचवर बसावं लागणार?
Auqib Nabi: आकिब नबीला टीम इंडियात मिळालं स्थान, पण खेळण्याची संधी मिळणार नाही? असं का?Image Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2026 | 8:20 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं गणित यावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात विजय मिळण्याचा दबाव टीम इंडियावर असणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकिब नबीला संघात स्थान दिलं गेलं आहे. रणजी ट्रॉफीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे. श्रीलंकेत पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचं कारण काय ते समजून घेऊयात..

आकिब नबी डेब्यू करणार का?

आकिब नबीला संघात स्थान मिळालं, पण प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. कारण त्याला जसप्रीत बुमराह जखमी झाल्याने संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे निवडकर्त्यांची पहिली पसंती नव्हता. त्यामुळे टीम इंडिया कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे. कारण श्रीलंकेची खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे फार तर दोन वेगवान गोलंदाजांसह शुबमन गिल मैदानात उतरेल. त्यामुळे आकिब नबीचा विचार होणं कठीण आहे. त्यामुळे पहिला वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून गुरनूर ब्रार यांची निवड होईल.

गुरनूर ब्रार हा दुसरी पसंती असण्याचं कारण म्हणजे टीम इंडिया व्यवस्थापनाने त्याची पारख करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याला आतापर्यंत सहा वनडे सामन्यात संधी दिली गेली आहे. यासह प्रसिद्ध कृष्णाही संघात आहे. जर गुरनूर ब्रारला डावललं तर दुसरा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. त्यामुळे आकिबचा नंबर लागणं कठीण आहे.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11 : शुबमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुथार, सारांश जैन, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश