Rohit Sharma : रोहितला किती दिवस सवलत देणार? त्याला संघात स्थान देऊ नये,’या’ खासदाराची प्रतिक्रिया
Team India Rohit Sharma : रोहित शर्माला टीम इंडियात स्थान देऊ नये. तो रोहित 2, 5, 10 आणि 20 अशा धावा करतो, असं म्हणत एका खासदाराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया मंगळवारी 4 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत भिडणार आहे. क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागून आहे. तर दुसर्या बाजूला काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा याच्याबाबत विधान करत अकलेचे तारे तोडले आहेत. रोहित शर्मा हा स्थूल खेळाडू असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे, असं म्हणत शमा मोहम्मद यांनी त्यांची अक्कल पाजळली आहे. तर दुसऱ्या बाजूला तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी शमा मोहम्मद या बरोबरच बोलल्यात असं म्हणत त्यांचं समर्थन केलंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी या दोन्ही नेत्यांना समाजमाध्यांवरुन धारेवर धरलं आहे.
सौगत रॉय काय म्हणाले?
“शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबाबत जे म्हटलंय त्याबाबत मी सहमत आहे. हे मी राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर क्रिकेट चाहता आणि प्रेक्षक म्हणून बोलतोय. रोहितला किती दिवस सवलत दिली जाणार? रोहितने गेल्या 2 वर्षात 1 शतक केलं. तसेच रोहित 2, 5, 10 आणि 20 अशा धावा करतो. रोहितचा संघात समावेश करायला नको. काँग्रेस नेत्या जे बोलल्यात ते योग्यच बोलल्यात”, अशी प्रतिक्रिया देत सौगत रॉय यांनीही आपली अक्कल दाखवून दिली आहे.
रोहित निष्प्रभ कर्णधार : शमा मोहम्मद
रोहित हा स्थूल खेळाडू आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. रोहित नशिबाने कर्णधार झालाय, असं वादग्रस्त ट्विट करत शमा मोहम्मद यांनी वाद ओढावून घेतला. शमा मोहम्मद यांनी रोहितवर केलेली टीका अंगाशी येतेय समजताच एक्स पोस्ट डिलिट केली. तसेच त्यानंतर शमा मोहम्मद यांनी माध्यमांसमोर येत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
येड्यांची जत्रा
#WATCH | On Shama Mohamed’s comments on Indian cricket team captain Rohit Sharma,TMC MP Saugata Roy says, “… What the Congress leader has said is right…Rohit Sharma shouldn’t even be in the team.” https://t.co/wkbHEfD5Pv pic.twitter.com/9AEHEi42NG
— ANI (@ANI) March 3, 2025
स्पष्टीकरण काय?
“अपमान करण्यासाठी एक्स पोस्ट केली नव्हती. रोहितचं खेळाडू म्हणून वजन जास्त असल्याचं म्हटलं. हे बॉडी शेमिंग नाही”, असं म्हणत शमा मोहम्मद यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
