RCB vs SRH Live Streaming : शनिवारपासून IPL 2026 चा थरार, आरसीबी-हैदराबाद भिडणार, पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : गतविजेता आरसीबी रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.आरसीबीसमोर सलामीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान आहे.

RCB vs SRH Live Streaming : शनिवारपासून IPL 2026 चा थरार, आरसीबी-हैदराबाद भिडणार, पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Virat Kohli vs SRH IPL
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 27, 2026 | 7:09 PM

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेत एकूण 65 दिवस 74 सामन्यांचा थरार रंगणार आहे. एकूण 10 संघांमध्ये साखळी फेरीत 70 तर प्लेऑफमध्ये 4 सामने होणार आहेत. या पर्वातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. आरसीबीने गेल्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे यंदा आरसीबी तोच झंझावात कायम राखत विजयी सलामी देणार की सनरायजर्स हैदराबाद सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने आपण 19 व्या हंगाामतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना शनिवारी 28 मार्चला होणार आहे.

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

आरसीबी-हैदराबादपैकी वरचढ कोण?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांची शनिवारी 28 मार्च रोजी आमनेसामने येण्याची ही 26 वी वेळ ठरणार आहे. सनरायजर्स हैदराबादने 25 पैकी सर्वाधिक 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता 19 व्या मोसमात कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड आऊट

दरम्यान सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. दोघांनाही काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यापासून दूर रहावं लागलं आहे.

Follow Us