RR vs CSK : नितीश राणाची धमाकेदार फिफ्टी, स्फोटक खेळीनंतर खास सेलिब्रेनशचं कारण काय?
Nitish Rana Fifty : नितीश राणा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं. नितीशचं राजस्थानसाठी हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वी जयस्वाल याने चौकार ठोकत स्वत:चं आणि राजस्थानच्या धावांचं खातं उघडलं. त्यानंतर यशस्वी पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर नितीश राणा मैदानात आला. त्यानंतर संजू आणि नितीश या दोघांनी पावरप्लेचा फायदा घेत तुफान फटकेबाजी केली. मात्र नितीशने संजूच्या तुलनेत फटकेबाजी केली आणि 2023 नंतर आयपीएल स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं.
नितीश राणाचं अर्धशतक
चेन्नईकडून खलील अहमद पावरप्लेमधील सहावी आणि शेवटची ओव्हर टाकायला आला. खलीलच्या पहिल्या बॉलवर संजूने एक धाव घेत नितीशला स्ट्राईक दिली. नितीशने खलीलला दुसऱ्या चेंडूवर फोर लगावला. त्यानंतर खलीलने तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर एकही धाव दिली नाही. नितीशने त्यानंतर पाचव्या बॉलवर चौकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं. नितीशने अशाप्रकारे 21 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 चौकारांसह हे अर्धशतक पूर्ण केलं. नितीशने 247.62 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. नितीशने यानंतर खास सेलिब्रेशन केलं. नितीशने बॅटचा पाळणा केला आणि त्याचं अर्धशतक जुळ्या मुलांना समर्पित केलं.
स्फोटक खेळी मात्र शतकापासून दूरच
दरम्यान नितीशने अर्धशतकानंतर फटकेबाजी अशीच सुरु ठेवली. नितीशची खेळी पाहता तो सहज शतक करेल, असं वाटत होतं. मात्र नितीश शतकापर्यंत पोहचू शकला नाही. नितीश 36 बॉलमध्ये 10 फोर आणि 5 सिक्ससह 81 रन्स करुन आऊट झाला. नितीशने 225 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली.
नितीश राणाचं अर्धशतकानंतर खास सेलिब्रेशन
Special celebration in new colours and as a father. Special! 💗👼 pic.twitter.com/1ZiXQdMujW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.
