Ruturaj Gaikwad च्या कॅप्टन्सीत सूर्यकुमार यादव खेळणार, टीम सीची घोषणा
Ruturaj Gaikwad Captain: टीम इंडियाचा युवा फलंदाज पुणेकर ऋतुराज गायकवाड याला कर्णधापरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव हा आता ऋतुराजच्या नेतृत्वात खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आगामी आणि प्रतिष्ठेच्या अशा दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 4 संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआय डोमेस्टिक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेच्या हंगामाला दुलीप ट्रॉफीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 4 संघ सहभागी होणार आहेत. त्यानुसार टीम ए, बी, सी आणि डी असे 4 संघ असणार आहेत. त्यानुसार सी संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आल आहे. बीसीसीआयने पहिल्या फेरीसाठी हे संघ जाहीर केले आहेत.
ऋतुराज गायकवाड कॅप्टन
टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ‘टीम सी’चा कर्णधार असणार आहे. टीम सीमध्ये ऋतुराज व्यतिरिक्त या टीम सीमध्ये टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 सप्टेंबरला स्पर्धेची सांगता होणार आहे. प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. प्रत्येक सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. सलामीचा सामना हा 5 सप्टेंबरला इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना हा इंडिया सी विरुद्ध इंडिया डी यांच्यात होणार आहे. स्पर्धेतील सारे सामने अनंतपूर आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहेत.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 4 संघ जाहीर
🚨 NEWS 🚨
Squads for first round of #DuleepTrophy 2024-25 announced
All The Details 🔽 @IDFCFIRSTBankhttps://t.co/EU0RDel975
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 14, 2024
दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक
5 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम बी, सकाळी 9 वाजता 5 सप्टेंबर, टीम सी विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता 12 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता 12 सप्टेंबर, टीम बी विरुद्ध टीम सी, सकाळी 9 वाजता 19 सप्टेंबर, टीम बी विरुद्ध टीम डी, सकाळी 9 वाजता 19 सप्टेंबर, टीम ए विरुद्ध टीम सी, सकाळी 9 वाजता
दुलीप ट्रॉफीसाठी टीम सी : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बाबा इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल (विकेटीकीपर) आणि संदीप वारियर.
