MI vs RR : हार्दिकचा अपमान पाहून भडकला प्रसिद्ध क्रिकेटर, Live मॅचमध्ये हजारो लोकांसमोर सरळ बोलला, की…
IPL 2024 MI Vs RR : क्वचितच तुम्ही दुसऱ्या एखाद्या सामन्यात जे दृश्य पाहिल असेल, ते मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्या दरम्यान पहायला मिळालं. मुंबई इंडियन्सचे फॅन्स कॅप्टन हार्दिक पांड्याविरोधात हूटिंग करत होते. त्याचवेळी टॉसच प्रेजेंटेशन करणारे संजय मांजरेकर यांचा संयम सुटला.

हार्दिक पांड्याच कॅप्टन होण मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना अजिबात पटलेलं नाही. हार्दिक पांड्या स्टेडियममध्ये असताना सतत त्याच्याविरोधात घोषणाबाजी आणि हूटिंग सुरु असते. IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत जिथे-जिथे सामने खेळलेत, तिथे-तिथे हार्दिकला विरोधाचा सामना करावा लागलाय. मुंबई इंडियन्सच होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर हेच दृश्य पहायला मिळालं. हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉससाठी मैदानावर येताच त्याच्या विरोधात हूटिंग सुरु झाली. टॉसच प्रेजेंटेशन करणारे संजय मांजरेकर यांनी जसं दोन्ही टीम्सच्या कॅप्टनच नाव पुकारल, तसं स्टेडियममध्ये हूटिंग सुरु झालं. त्यानंतर संजय मांजरेकर भडकले. त्यांनी स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना थोडं नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला.
संजय मांजरेकरने भले मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला असेल, पण ते ऐकले नाहीत. हार्दिक पांड्या विरोधात हूटिंग शिवाय स्टेडियममध्ये रोहित-रोहित घोषणाबाजी झाली. इतकच नाही, हार्दिक पांड्या बॅटिंगसाठी आला, तेव्हा सुद्धा फॅन्स हूटिगं करत होते. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर आऊट होताच मुंबई इंडियन्सच्या फॅन्सच मन मोडलं. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टचा आऊट स्विंगर हिटमॅनला समजला नाही. तो आपल्या घरच्या मैदानात गोल्डन डकवर आऊट झाला.
बोल्टचा मुंबईला हादरा
फक्त रोहित शर्माच नाही, त्याच्यासोबत नमन धीरला सुद्धा पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. डेवाल्ड ब्रेविस सुद्धा शुन्यावर आऊट झाला. त्याची विकेट सुद्धा ट्रेंट बोल्टनेच काढली. बोल्टने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला तीन झटके दिले.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals win the toss and elect to bowl against @mipaltan #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/pziDfHNIci
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
कॅप्टन बदलल्याचा मुंबईला फटका
चौथ्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सचे 4 विकेट गेले होते. इशान किशन सुद्धा 16 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा जोडीने डाव सावरला. हार्दिकने वेगाने फलंदाजी करुन राजस्थान रॉयल्सवर दबाव आणला. हार्दिक सेट झाल्यानंतर चहलच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळून तो आऊट झाला. पांड्याने 21 चेंडूत 34 धावा केल्या. तिलक वर्माने 32 धावा केल्या. त्याची विकेट सुद्धा युजवेंद्र चहलने काढली. कॅप्टन बदलल्यानंतर मुंबई इंडियन्सच नुकसान होतय. टीमला आपल्याच फॅन्सकडून सपोर्ट मिळत नाहीय.
