‘या’ चार कारणांमुळे ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला मिळाली पाहिजे होती संधी

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 13, 2022 | 2:02 PM

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची काल घोषणा झाली. जवळपास आशिया कपसारखीच टीम टी 20 वर्ल्डकपसाठी निवडली आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा टी 20 वर्ल्ड कपला मुकणार आहे.

'या' चार कारणांमुळे ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला मिळाली पाहिजे होती संधी
Sanju-Samson
Image Credit source: AFP

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची काल घोषणा झाली. जवळपास आशिया कपसारखीच टीम टी 20 वर्ल्डकपसाठी निवडली आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा टी 20 वर्ल्ड कपला मुकणार आहे. दिनेश कार्तिक आणि अर्शदीप सिंहचा स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतलाही टीम इंडियात स्थान दिलय.

ऋषभ पंतला चांगला पर्याय ठरला असता

टी 20 मध्ये ऋषभची कामगिरी अपेक्षेनुसार नाहीय. चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला टीममध्ये स्थान दिलेलं नाही. टी 20 वर्ल्ड कपसाठी संजू सॅमसन ऋषभ पंतला चांगला पर्याय ठरला असता. त्याची चार कारणं आहेत.

  1. संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये असूनही त्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. संजू सॅमसनने 2022 मध्ये चांगली कामगिरी केलीय. टीम इंडियाने यावर्षात आतापर्यंत 26 टी 20 सामने खेळलेत. यात 5 इनिंगमध्ये सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 44.8 च्या सरासरीने 179 धावा केल्या. तेच पंतची सरासरी 25.9 होती. त्याने 311 धावा केल्या.
  2. सॅमसनचा मिडल ओव्हरमध्ये स्ट्राइक रेट कमालीचा आहे. मधल्या ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. 2022 मध्ये सॅमसनचा स्ट्राइक रेट 158 पेक्षा जास्त आहे. पंतचा स्ट्राइक रेट फक्त 133.4 आहे.
  3. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर संजू सॅमसन चांगला चांगला फलंदाज ठरला असता. खुद्द कॅप्टन रोहित शर्मा आणि माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सुद्धा हेच म्हटलय. सॅमसनकडे कट आणि पुलचे चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे.
  4. संजू आणि ऋषभ पंत दोघेही अनेकदा धोके पत्करुन फलंदाजी करतात. ऋषभ पंतला जितकी संधी मिळाली, त्यात तो बऱ्याचदा अपयशी ठरला. त्याच्या शॉट सिलेक्शनवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. संजू सॅमसन या आघाडीवर पंतपेक्षा सरस आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI