AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : संजू सॅमसन याचा एका सामन्यातच लागला निकाल! राहुल द्रविड म्हणाला…

संजू सॅमसन आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स खेळत असून त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण भारतीय संघातील त्याचं स्थान डळमळीत आहे. आता त्याच्याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Team India : संजू सॅमसन याचा एका सामन्यातच लागला निकाल! राहुल द्रविड म्हणाला...
संजू सॅमसन याच्याबाबत राहुल द्रविड यानं केलं मोठं वक्तव्य, वर्ल्डकप स्पर्धेत...
| Updated on: Jul 31, 2023 | 7:48 PM
Share

मुंबई : संजू सॅमसन याने कायमच आपल्या आक्रमक खेळीने क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. आयपीएलमध्ये त्याने आपल्या खेळीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याची वर्णी भारतीय संघात लागावी यासाठी सोशल मीडियावर रान उठल्याचं पाहायला मिळालं आहे. पण अनेकदा संधी मिळूनही संजू सॅमसन हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती. मात्र संधीचं सोनं करण्यात त्याला यश आलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीबाबत आणि निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता प्रशिक्षक राहुल द्रविड याने संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला प्रशिक्षक राहुल द्रविड?

“वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसलेल्या खेळाडूंची पारख करण्याची संधी होती.”, असं वक्तव्य राहुल द्रविड याने सामन्यानंतर केलं होतं. यातूनच त्याने सर्वकाही सांगितल्याचं दिसून येतं. या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे.

भारताला कोणत्याही परिस्थितीत विंडीड विरुद्ध मालिका जिंकायची आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत निवड होण्याचं स्वप्नही धुळीस मिळताना दिसत आहे. संजू सॅमसन वनडे मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतही टीम इंडियाचा भाग आहे.

केएल राहुल आणि अय्यरची जोरदार तयारी

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहेत. उपचारानंतर आता एसीएमध्ये हळूहळू ट्रॅकवर येत आहेत. आशिया कप स्पर्धेपूर्वी हे दोघंही फीट होतील असा अंदाज आहे. त्यामुळे संजू सॅमसनचं वनडे फॉर्मेटमधील पुनरागमन लवकर शक्य नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

सूर्यकुमार यादव याला मिळणार संधी?

संजू सॅमसन याच्या प्रमाणे सूर्यकुमार यादव हा देखील काही खास करू शकलेला नाही. दोन्ही वनडे सामन्यात फेल गेला आहे. यापूर्वीही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तीन वेळा शून्यावर बाद झाला आहेत. पण असं असताना सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. टी20 स्पर्धेतील चांगल्या खेळीमुळे त्याला आणखी एक संधी मिळेल. सूर्यकुमार की संजू सॅमसन असा प्रश्न आला तर सूर्यकुमारची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे संजू सॅमसन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसला नाही तर आश्चर्य वाटायला नको.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.