AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधी विराटने धरला वेगळा मार्ग!

west indies vs team india 3rd odi | टीम इंडिया विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा 1 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

Virat Kohli | विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधी विराटने धरला वेगळा मार्ग!
| Updated on: Jul 31, 2023 | 6:54 PM
Share

त्रिनिदाद | टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळवण्यात आले आहेत. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने विजयी सलामी दिली होती. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसरा सामना जिंकून विंडिजने बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सर्व गडबडीदरम्यान टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

टीम इंडियाची विंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. विंडिजने टीम इंडियाला 2006 मध्ये एकदिवसीय मालिकेत 3-1 ने पराभूत केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाने सातत्याने विंडिजवर वनडे सीरिजमध्ये विजय मिळवलाय. मात्र आता मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियावर तब्बल 17 वर्षांनी वनडे सीरिज गमावण्याची टांगती तलवार आहे.

टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली हा टीम इंडियासोबत तिसऱ्या मॅचसाठी प्रवास केलं नसल्याचं समजतंय. त्यामुळे विराटला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली. तर संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र इथे हा प्रयोग फसला. विंडिजने टीम इंडियावर विजय मिळवला. त्यामुळे आता तिसरी मॅच ही निर्णायक स्थितीत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली सोबत नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर विराट कोहली तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार नसेल, तर टीम इंडियासाठी निश्चितच चिंताजनक बाब असेल.

दरम्यान या एकदिवसीय मालिकेनंतर विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 13 ऑगस्ट रोजी 5 वी आणि अंतिम मॅच खेळवण्यात येईल.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.