AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2025 Final: वडिलांच्या एका चिठ्ठीने सारांश जैनचं आयुष्य बदललं, असं झालं होतं की…

South Zone vs Central Zone, Final: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोन आणि साउथ झोन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होत आहे. या सामन्यात सेंट्रल झोनच्या सारांश जैनने साउथ झोनचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आहे. पण वडिलांच्या एका चिठ्ठीने त्याच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला.

Duleep Trophy 2025 Final: वडिलांच्या एका चिठ्ठीने सारांश जैनचं आयुष्य बदललं, असं झालं होतं की...
Duleep Trophy 2025 Final: वडिलांच्या एका चिठ्ठीने सारांश जैनचं आयुष्य बदललं, असं झालं होतं की...Image Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2025 | 8:17 PM
Share

दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरुच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात सेंट्रल झोन आणि साउथ झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील पहिल्याच दिवस सेंट्रल झोनने गाजवला. त्यामुळे पहिल्या दिवशी साउथ झोन पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. या सामन्यात 32 वर्षीय फिरकीपटून सारांश जैनने साउथ झोनचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे त्याच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. सारांश जैनने 24 षटकात 49 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे साउथ झोनचा संघ 149 धावांवरच सर्वबाद झाला. तर पहिल्या दिवसअखेर सेंट्रल झोनने विनाबाद 50 धावा केल्या आहेत. चला जाणून घेऊयात सारांश जैन कोण आहे?

सारांश जैन हा इंदुरचा असून मध्य प्रदेशच्या रणजी संघातील खेळाडू आहे. अष्टपैलू सारांश जैनने 43 फर्स्ट क्लास सामने खेळले असून आतापर्यंत 139 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर 31 आणि 18 विकेट आहेत. सारांशचे वडील सुबोध जैन हे मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळले आहेत. त्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवून सारांशने क्रिकेटमध्ये करिअर करण्याच निर्णय घेतला. पण वडिलांच्या एका मेसेजमुळे त्याचं आयुष्य पालटलं. कारण 2014 साली तसंच काहीसं घडलं होतं. 2014 मध्ये रणजी ट्रॉफीत सारांश जैनने पदार्पण केलं होतं. तसेच मध्य प्रदेशातील एका क्लब संघासोबत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता.

सारांश जैन ऑस्ट्रेलियात असताना घरून फोन येत नव्हते. यामुळे सारांश नाराज झाला होता. दौऱ्यावरून परतल्यानंतर सारांश जेव्हा घरी आला तेव्हा त्याला धक्का बसला. कारण वडील बेडवर पडले होते आणि त्यांच्या चेहऱ्याचं ऑपरेशन झालं होतं. सुबोध जैन यांना कर्करोग झाला होता. त्यांनी सारांश जैनला एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात मेसेज लिहिला होता की, ‘बेटा, मी आता ठीक आहे. जर तू चांगला खेळलास तर मी लवकरच बरा होईन.’ सारांशने वडिलांची ही आठवण अजूनही जपून ठेवली असून हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.